आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आणि सावरपाडा एक्सप्रेस म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कविता राऊत यांनी आज राज्यापालांची भेट घेतली. महाराष्ट्रासोबतच नाशिकचे नाव उंचावणाऱ्या धावपटू कविता राऊत यांना शासकीय नोकरीसाठी ही भेट घेतली आहे.
आज कविता राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन क्लास 1 च्या पदासाठी नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे. २०१४ पासून पाठपुरावा करून देखील संधी मिळत नाही. शैक्षणिक असली तरी माझी सामाजिक पात्रता नसल्याने, असा दुजाभाव होत आहे. असे कविता राऊत म्हणाल्या.
“२०१४ पासून वर्ग एकच्या पदासाठी अर्ज केलेल्याची फाईल अद्याप प्रोसेसमध्येच आहे. मी वेळोवेळी फॉलोअप घेऊनही अद्याप मला न्याय मिळालेला नाही. सध्या ओएनजीसीमध्ये देहरादूनला माझी पोस्टिंग करण्यात आलेली आहे. मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाली आहे आणि ग्रामीण भागांतील खेळाडूंच्या समस्या माझ्यापेक्षा जास्त कोणाला समजू शकत नाहीत.” असे त्या म्हणाल्या.
तर “मला महाराष्ट्रासाठी माझ्या ग्रामीण भागांतील खेळाडूंसाठी मला काम करायचं आहे. हाच विचार समोर ठेवून मी अर्ज केला होता. पण अद्यापही मला न्याय मिळालेला नाही.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ऑलम्पिक पार्टीसिपेंट , एशियन गेम्स डबल मेडल , कॉमन वेल्थ गेम्स मेडल, साऊथ एशियन गेम्स गोल्ड मेडल, नेशनल गेम्स रेकॉर्ड होल्डर , अर्जुन पुरस्कारच्या त्या मानकरी आहेत.
मोदी बकरा होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल, किंमत वाचून बसेल धक्का…