अरर..!‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री चढत होती नवऱ्याच्या खांद्यावर अन् अशी पडली धपकन, पहा व्हिडीओ

मुंबई | एफआयआर या टीव्ही शो मध्ये इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटालाची भूमिका खूप लोकप्रिय झाली आहे. हे पात्र साकारणारी कविता कौशिक सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टीव्ह असते. आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत कविता कौशिकचा तिचा पती रोनित बिस्वास याच्यासोबत दिसत आहे. त्यामध्ये ती रोनितसोबत योग करत आहे. व्हिडिओमध्ये कविता कौशिकचा नवरा जमिनीवर बसलेला दिसतो आणि कविता त्याच्या मागे उभी राहिली आहे. यानंतर कविता त्याच्या खांद्यावर चढण्याचा प्रयत्न करते. परंतु कविताचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने ती खाली आपटते.

व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री कविता कौशिकने त्याला छान कॅप्शन दिले आहे. ती लिहिते की, कोणीही त्यांचे अपयश सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. हे तुम्ही जे पाहात आहात हेच चित्र खरं आहे. आयुष्यात तुम्ही पडा मग उठा आणि उभे रहा. आयुष्य असेच काहीसे आहे यश आणि अपयशांनी भरलेले. यात प्रत्येक वेळी आपण नवीन सुधारणा करतो.

तसेच, कविता या पोस्टमध्ये गंमतीने लिहते, व्हिडीओतील अपयश फक्त जेव्हा तुम्ही सकाळी नाश्त्याला भरपूर पराठे खाल्ले तरच येते. कविताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
नाद करा पण यांचा कुठं! बुलेट नाही, तर आता ‘महाराजा थाळी’ संपवा आणि जिंका एक तोळं सोनं
गजानन मारणेसाठी धडकी भरवणारी बातमी! पुण्यातील साम्राज्य उद्धवस्त करण्याची पोलीस आयुक्तांची घोषणा
रिअल हिरो! सैनिकांचा थंडीपासून बचाव होण्यासाठी रॅंचोने बनवलं अनोखं टेंट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.