देशात धार्मिक मुद्यावरुन राजकारण होताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दंगली होत असून यामध्ये लोकांचे जीवही जात आहे. पण आता जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांदरम्यान लष्कराच्या जवानांनी पुढाकार घेत स्थानिक जनतेला एकतेचा संदेश दिला आहे. (kashmir army officers namaz photo viral)
त्या जवानांनी इफ्तारला हजेरी लावली आणि नंतर त्यांच्यासोबत नमाज अदा करून बंधुभावाचा आदर्श ठेवला आहे. श्रीनगरमधील ओल्ड एअर फील्ड येथे लेफ्टनंट जनरल डीपी पांडे आणि त्यांच्यासह इतर जवान एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी नमाद अजा केली आहे.
हाऊस ऑफ टेरर नावाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दक्षिण ते उत्तर काश्मीरमधील स्थानिक लोकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान, चिनार कॉर्प्सच्या जनरल ऑफिसर कमांडिंगच्या वतीने ते खोऱ्यातील लोकांना पूर्ण पाठिंबा देतील आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील असे सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमानंतर लष्कराचे जवान स्थानिक लोकांसोबत इफ्तारमध्ये सहभागी झाले आणि नंतर नमाज अदा करण्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाबाबत स्थानिक लोकांशी चर्चा केली असता, लष्करानेच अशी मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
तसेच स्थानिक नागरीक तिथे उपस्थित असलेल्या जवानांशीही बोलताना दिसले. भविष्यातही लष्कराचे जवान येऊन त्यांच्याशी संवाद साधतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जवानांचे नमाज अदा करण्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच जवानांनी नमाज अदा करुन बंधुतेचा आदर्श ठेवला आहे
जे पुस्तक प्रकाशित झाले, त्यात काश्मीरचीच कथा आहे. अन्वर उमर नावाच्या व्यक्तीचे हे आत्मचरित्र आहे. एका व्यक्तीने दहशतवादी ते इखवान असा प्रवास कसा केला हे पुस्तकात सांगण्यात आले आहे. या पुस्तकात पाकिस्तानच्या कारस्थानावरून तरुणांना कट्टरपंथी बनवण्यावरूनही पडदा उचलण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
काश्मिरमध्ये भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केली नमाज अदा, व्हायरल फोटोंनी जिंकली लोकांची मने
‘या’ पाच कारणांमुळे बिघडला प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा खेळ, वाचा सविस्तर..
पहिल्यांदाच समोर आली पूनम पांडेची आई, भावूक होत म्हणाली, ही माझी मुलगी नाही तर…