कसाब विरोधात साक्ष दिली तेव्हाच ठरवले, आता पोलिसच होणार आणि…

मुंबई । आज मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे पोलीस अधिकाऱ्यांचे जीव गेले. अनेकांचे आयुष्य यामुळे उध्वस्त झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता.

या हल्ल्याच्या दिवशी देविका नावाची मुलगी आणि तिचे वडील नटवरलाल भाऊ जयेश हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला होते. ते पुण्याला निघाले होते. मात्र कसाब आणि अतिरेकी ईस्माईल यांनी गोळीबार सुरु केला. वडिलांनी दोन्ही मुलांना घेऊन टर्मिनसमधून बाहेर पडायचा प्रयत्न केला.

देविकावर कसाबने गोळ्या झाडल्या आणि तिचा पाय निकामी झाला. ती कशीबशी वाचली. मात्र शाळेतील तीची वर्षेही वाया गेली. पण तिने आता एक निश्चय केला आहे. ज्या दहशतवादाला ती बळी पडली तिचा सामना आता तीला पोलिस होऊन करायचा आहे. असे तिने ठरवले आहे.

देविका मुंबई हल्ला खटल्यातील सर्वात लहान दहा वर्षाची साक्षीदार. तिने न्यायालयात कसाबकडे बोट दाखवून, याने माझ्यावर गोळी झाडली असे न घाबरता ठामपणे सांगितले होते. तिला चालता येत नव्हते तरी कुबड्यांंच्या सहाय्याने जेव्हा ती न्यायालयात आली होती.

ती म्हणाली, आतापर्यंत माझे शिक्षण पूर्ण व्हायला हवे होते. पण एके 47 च्या गोळ्या लागल्यामुळे काही वर्ष अशीच गेली. मात्र आता मी शिक्षण पूर्ण करणार आणि आयपीएस परीक्षेची तयारी करणार आहे. असा निश्चय तिने केला आहे. तशी तयारी देखील तिने केली आहे. सरकारकडून देखील तिला हवी ती मदत केली जाणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.