करुणा शर्मा यांना जामीन मंजूर, जेलमधून बाहेर येताच धनंजय मुंडेंबद्दल भूमिका बदलली? म्हणाल्या..

बीड । गेल्या काही दिवसांपासून करुणा मुंडे यांच्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा ५ सप्टेंबर रोजी परळीत दाखल झाल्या होत्या. दरम्यान, त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली होती. यामुळे त्या जेलमध्ये होत्या.

असे असताना करुणा मुंडे यांना आज न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा मुंडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाने आज दिला आहे. १६ दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ‘नो कमेंट्स’ असे उत्तर देत बोलण्यास नकार दिला. यानंतर त्या गाडीत बसून निघून गेल्या. यामुळे त्या थोड्या मवाळ झाल्याचे दिसून आले. त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

खास माध्यमांशी बोलण्यासाठी काही दिवसांपूर्वी त्या परळीत आल्या होत्या. मात्र, आज स्वत:हून पत्रकार त्यांच्याशी बोलण्यास गेले, मात्र करुणा यांनी मौन बाळगणे पसंत केले. यावरून करुणा शर्मा नरमल्या असल्याचे दिसून येत आहे. आता त्या काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत देखील अनेक गोष्टी माहीत असल्याचे सांगितले होते. यामुळे वातावरण तापले होते.

करुणा शर्मा परळीत येत असताना त्यांच्या गाडीत रिव्हॉल्व्हर देखील सापडला होता. यामुळे देखील खळबळ उडाली होती. यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.