करुणा शर्मा प्रकरण: चालक अरुण मोरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड। परळी येथील वैजनाथ मंदिर परिसरात जातीवाचक शिविगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी करुणा शर्मा यांचा चालक अरुण मोरे याच्या विरोधात अॅट्रॉसिटी व जीवे मारण्याचा प्रयत्न आणि मोरेवर पुन्हा पिस्तूल प्रकरणी गुन्हा नोंद झाला. व त्यानंतर परळी पोलिसांनी करुणा शर्मा आणि अरुण मोरे दोघांना अटक केली.

मात्र आता याचसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अरुण मोरे यास गुन्ह्याप्रकरणी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यास मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी आता १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

याच प्रकरणी करुणा शर्मा यांनादेखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. सोमवारचा त्यांचा मुक्काम कारागृहातच झाला असून मंगळवारची रात्रही त्यांना कारागृहातच घालवावी लागली.

इतर पाच महिला कच्चे कैदी व करुणा शर्मा असे सहा महिला कच्चे कैदी कारागृहात आहेत. त्यामुळे आता दिवसेंदिवस हे प्रकरण नवीन वळण घेत आहे. परळी येथील वैजनाथ मंदिराच्या समोर दर्शनासाठी आल्यानंतर करुणा मुंडे यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला होता.

या नंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तुल आढळून आली, यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

परळी शहरात करुणा मुंडेंच्या पार्श्‍वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मंदिराच्या समोर करुणा मुंडे यांना अडवले. यावेळी परळीतील महिला नेत्यांना जाब विचारला परिस्थिती तणाव निर्माण होता. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहे.

धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यानंतर परळी शहरात रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. करुणा मुंडे यांनी दोन दिवसांपुर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत परळीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती.

या पत्रकार परिषदेत आपण आपले पती व इतरांच्या विरोधात अनेक पुरावे सादर करून काही गोष्टींचा व षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांच्या पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. व आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.