अभिनेता कार्तिक आर्यन १० दिवसांत झाला कोट्यधीश, जाणून घ्या कशी लागली लॉटरी

मुंबई । अगदी थोड्या दिवसात बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावलेला अभिनेता म्हणजेच कार्तिक आर्यन सतत चर्चेत आहे. त्याच्याकडून वारंवार जाणारे सिनेमे हे चर्चेचा विषय ठरत आहे. दोस्ताना 2 मधून त्याला काढण्यात आले. त्यानंतर आनंद एल राय यांच्या सिनेमातूनही त्याला वगळण्यात आले. यामुळे कार्तिक आर्यन दुसरा सुशांतसिंह राजपूत होतोय का या चर्चे सुरू झाल्या.

‘लव्ह आज कल 2’ मधून त्याला मोठा ब्रेक मिळाला. त्याच्या कामाचे मोठे कौतुक झाले. अलिकडे कार्तिकने अलिशान गाडीही घेतली. यामुळे आता त्याचे करिअर सेट झाले, असे सांगितले जात होते. असे असताना कार्तिक अनेक सिनेमातून वगळला जाऊ लागला. त्याला आपण क्रिएटिव डिफरन्सेस म्हणतो त्याचे कारण पुढे करण्यात आले. पण तसे खरंच असेल असे वाटत नाही.

याचे कारण म्हणजे कार्तिकला एक भली मोठी रक्कम मिळालेली आहे. त्याचे कारण, त्याने केलेला ‘धमाका’ हा चित्रपट. धमाका’ हा चित्रपट तयार झाला तो केवळ १० दिवसांत. कार्तिक आर्यनने जेव्हा ‘दोस्ताना 2’ स्वीकारला तेव्हाच, त्याला ‘धमाका’ आला होता.

जो त्याने स्वीकारला. या १० दिवसांसाठी कार्तिकला मिळालेले मानधन काही कोटीत आहे. यामुळे पुन्हा त्याचे चांगले दिवस आले आहेत. कार्तिकने ‘धमाका’ फिल्म स्विकारली आणि त्याला ही रक्कम एकाचवेळी अदा झाल्याचेही कळते. धमाकामध्ये असलेल्या भूमिकेसाठी कार्तिकला मिळालेली रक्कम आहे तब्बल १८ कोटी रुपये.

यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. काही ट्रेड एनालिस्ट यांनीही ही गोष्ट ऑफ द रेकॉर्ड मान्य केली आहे. पण याला कोणताही अधिकृत पुरावा अद्याप नाही. कार्तिकचे काम पाहून निर्मात्यांनी त्याला ही रक्कम देऊ केली आहे. यामुळे पुन्हा एकदा त्याची गाडी रुळावर आली आहे.

ताज्या बातम्या

बॉयफ्रेंडचे निघाले आणखी तीन मुलींसोबत अफेअर; तरुणीने ‘असा’ घेतला बॉयफ्रेंडशी बदला

आनंदाची बातमी! SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन तुम्ही पण करु शकता हजारोंची कमाई; जाणून घ्या कसे…

‘या’ गावात महिला नाही तर चक्क पुरुष सांभाळतात चूल; दिलं जातं स्पेशल ट्रेनिंग

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.