kartik aaryan : कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटांसह त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतो. पूर्वी त्याचे नाव सारा अली खानशी जोडले जात होते. त्यानंतर त्याचे नाव त्याची को-स्टार कृति सेननशीही जोडले गेले होते, आता या अभिनेत्याचे नाव हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मीनाशी जोडले जात आहे.
बॉलिवूडमध्ये अनेक शानदार चित्रपटांमध्ये दिसलेला कार्तिक आर्यन सध्या त्याच्या अनेक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याचे चाहते त्याला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात. कार्तिक आर्यन त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. पण आता हृतिक रोशनच्या चुलत बहीण पश्मिनासोबतच्या लिंकअपच्या वृत्तावर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
कार्तिक आर्यनने संवाद साधताना सांगितले की, ‘मला एक अभिनेता म्हणून इतके समजले आहे की, मला अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागेल. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सार्वजनिक होत राहतील. पण मी कुणाशी मैत्री ठेवली किंवा कुणाला भेटलो तरी त्या व्यक्तीच आणि माझ काहीतरी नात असल्याचा टॅग दिला जाईल.
पण इथे खास गोष्ट अशी आहे की कधी-कधी सेलिब्रिटींनाही या सगळ्या गोष्टींची काळजी वाटते. पण नंतर हळूहळू या सगळ्या गोष्टींची सवय होऊन जाते. मी प्रामुख्याने माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. आपले म्हणणे मांडत कार्तिक पुढे म्हणतो, ‘अनेकदा सोशल मीडियावर घडणाऱ्या अशा गोष्टींमुळे आपल्यालाही खूप फरक पडतो, जर काही नकारात्मक घडले तर त्याचा माझ्यावरही परिणाम होतो.
जेव्हा मी काही केले नाही आणि विनाकारण माझे नाव देऊन त्या गोष्टीचा प्रचार केला जातो, तेव्हा मला फरक पडतो. पण आता मी या गोष्टींना सामोरे जायला शिकत आहे. फिल्मस्टारच्या आयुष्यात प्रायव्हसी ठेवणे खूप अवघड असते हे सत्य स्वीकारले आहे.
सध्या कार्तिककडे अनेक मोठ्या प्रोजेक्टचे चित्रपट आहेत. असे अनेक चित्रपट आहेत ज्यासाठी कार्तिकचे चाहते खूप उत्सुक आहेत. कार्तिकच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर तो लवकरच कॅप्टन इंडिया, शहजादा, फ्रेडी, सत्यप्रेम की कथा, लुका छुपी 2 आणि कबीर खान दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Vikram Gokhale : ‘शाहरूख खान माझं काहीही वाकडं करू शकत नाही’; जेव्हा विक्रम गोखले थेट किंग खानलाच नडले होते; वाचा भन्नाट किस्सा..
सतत फ्लॉप रिषभ पंतला पुन्हा संधी, मात्र चांगल्या धावा करूनही संजू सॅमसनला ठेवले संघाबाहेर
Shikhar Dhawan : अपयशी ठरूनही पंतला संघात स्थान का? संजू सॅमसनला संधी का नाही? अखेर कर्णधार धवनने सांगीतले कारण