सध्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. करणी सेनेने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कमाईतील ५०% रक्कम दान करण्यास सांगितले आहे. दान केलेली रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी वापरता येईल, असे करणी सेनेने सांगितले आहे. करणी सेनेने चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना यासंदर्भात विनंती केली आहे.(karni sena statement to producer on 50% box office collection donate to kashmiri pandits)
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल सिंह अमू यांनी चंदीगडमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंदर्भात वक्तव्य केलं आहे. यावेळी करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल सिंह अमू म्हणाले की, “बहुतेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त घोषित केला आहे, जेणेकरून सर्वसामान्यांनाही तो पाहता येईल. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पुढे येऊन चित्रपटाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम दान करावी. जेणेकरून ती रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरता येईल.”
सूरज पाल सिंग अमू पुढे म्हणाले की, “द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या निर्मात्यांनी ५० टक्के रक्कम दान केली नाही तर, त्यांनी हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या फक्त व्यथा दाखविण्यासाठी बनवला आहे असे मानले जाईल. चित्रपटाच्या निर्मात्यांना त्यांची काळजी नाही. तसे झाले नाही तर करणी सेनेचे लोक हा चित्रपट पाहणार नाहीत.”
यावर चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी रक्कम दान करण्यासंदर्भात कोणतीही घोषणा केली नाही. द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने आतापर्यंत १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने सलग आठव्या दिवशी १९.१५ कोटींची कमाई केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडला आहे.
बॉलिवूड चित्रपट आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “काश्मीर फाइल्स चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटाने ८ व्या दिवशी १९.१५ कोटींची कमाई केली आहे. हे कलेक्शन बाहुबली २ (१९.७५ कोटी) चित्रपटाच्या आसपास आहे आणि दंगल (१८.५९ कोटी) पेक्षा जास्त आहे. हे दोन्ही चित्रपट आयकॉनिक हिट आहेत. ”
हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर भाष्य करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कर्नाटक, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. इतर राज्यांमध्ये देखील हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
१०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले, तरी ब्लेडचे डिझाइन आजही तसेच का आहे माहितीये का?
तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत वाद, मुनगंटीवार आणि अजितदादा भिडले
लहान मुलांच्या झोक्यावर खेळण्याची मस्ती तरुणांना पडली महागात; व्हिडिओ पाहाल तर हसून-हसून लोटपोट व्हाल