कर्नाटकातील भाजप सरकारने प्राचीन मंदीरावर फिरवला बुलडोझर; मंदीर उद्धवस्त

कर्नाटकातील म्हैसूर जिल्यातील नांजनगूड येथील मंदिर पाडण्यावरून वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर मंदिर पाडण्याचा आरोप केला आहे.

ते म्हटले की, “स्थानिक रहिवाशांची अनुमती न घेता मंदिर पडल्यामुळे तेथील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.” त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर आरोप केले आहेत. यामध्ये ते म्हणाले, “नांजनगूड हे एक प्राचीन मंदिर असून या प्राचीन मंदिराचा विध्वंस निंदनीय आहे. हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. भाजपने हे मंदिर पाडायच्या आधी या भागातील स्थानिक लोकांची परवानगी न घेतल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

पुढे ते म्हणाले, मंदिर पाडायला आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी देखील योग्य प्रकारे प्रक्रियेचे पालन केले नाही. ‘न्यायालयाचा आदेश असला तरी, प्रशासनाने मंदिर पाडण्याचा आदेश लागू करण्यापूर्वी विचार विनिमय करूनच हा आदेश जारी करायला हवा होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी यावर सांगितले की, त्यांना राज्यभरातील बेकायदेशीर धार्मिक वस्तू पाडण्याचे आदेश मिळाले आहे, ज्याचे पालन ते करत आहे. तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) नुसार ते मंदिर नकाशावर नव्हते ते केवळ १२ वर्ष जून असल्याने त्याला तोडण्याचे आदेश मिळाले आहेत.

कर्नाटकातील सत्ताधारी आणि विरोधक हा वाद काही नवीन नाही आहे. भाजप सत्तेत आल्यापासून तेथील विरोधक भाजप वरती कुरघोडी करायला बघत आहेत. न्यायालयाचा आदेश असून देखील विरोधकांनी मंदिर तोडण्यास विरोध करणे अत्यंत चुकीचे असून लोकांच्या भावनिक गोष्टींचे राजकारण केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करणे हे राजकारणाला काळीमा फासण्यासारखे आहे.

अशी प्रतिक्रीया तेथील सत्ताधारी भाजपने दिली आहे. अजून ६३९५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालवणे अजून बाकी असल्याची माहिती तेथील मुख्य सचिवांनी दिली आहे. त्यामूळे हा वाद अजून किती चिघळतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

महत्वाच्या बातम्या
त्यावेळी मला मरावंस वाटत होतं; दिपीकाने सांगीतला ‘तो’ भयानक किस्सा; अशी वेळ कुणावरही येऊ नये…
मोदी शहांचे पुन्हा धक्कातंत्र! भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; जाणून घ्या कोण आहेत भूपेंद्र पटेल
मानलं बुवा! इस्त्रायलमधील कैद्यांचा आगळावेगळा प्रताप; चमचाने बोगदा खाणुन तुरूंगातून काढला पळ
अखेर गुपित फुटलेच! मुलांची नाव तैमुर व जहांगीर का ठेवली? करीनाने स्वतःच केला खुलासा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.