G. Parameshwara : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अशातच कर्नाटकच्या बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांमुळे एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर(G. Parameshwara) यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान संबंधित तरुणाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे. हे ऐकताच उपस्थित काही लोकांनी त्याला मारहाण केली. मारहाणीचे प्रमाण इतके गंभीर होते की, त्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.
पोलिसांची तत्काळ कारवाई
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 10-12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, कायदा हातात न घेण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. त्यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि शांतता टिकवण्याचे आवाहन केले.
karnataka-home-minister-g-parameshwara-gave-information-about-the-incident