हेच ऐकायचं बाकी होतं! ‘छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच’; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा

सीमा प्रश्नावरुन मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात तणाव निर्माण झाला आहे. आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे’, असं वक्तव्य केले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच आहेत. कन्नड भूमीतील आहेत,” असा अजब गजब दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ यांनी केला आहे. तसेच “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही. त्यांनी तो वाचलाही नाही.” अशीही टिका त्यांनी केली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत,” असा गोविंद कार्जोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

“कर्नाटकात दुष्काळ पडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत. तसेच, कर्नाटकात मराठी, कन्नड जनता प्रेमाने राहते. जात मराठा असली तरी ते कन्नडच आहेत. महाराष्ट्रात देखील कन्नड मराठी जनता प्रेमाने राहते, असे गोविंद कार्जोळ म्हणाले.

लोकल फॉर व्होकल! शेणापासून बनवलेल्या पेंटला देशभरात मिळतोय प्रतिसाद

‘अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती’, बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली नाराजी 

तुकाराम मुंढेंचा कोरोना काळात भाजपच्या नेत्यांसोबत राडा होऊनही गडकरींनी केले मुंढेंचे कौतुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.