Share

महिलांनी घातलेले कपडे पुरुषांना उत्तेजित करतात, त्यामुळे बलात्काराच्या घटना घडतात; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

bjp-mla-renukachrya.

कर्नाटकमध्ये(Karnataka) सध्या शाळा आणि कॉलेजमध्ये मुस्लिम मुली हिजाब घालत असल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून देशभरात वातावरण तापलं आहे. राजकीय पक्षांचे नेते हिजाबच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता कर्नाटकच्या भाजप(BJP) आमदाराने केलेल्या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(karnatak bjp mla renukacharya conterversional statement)

महिलांच्या कपड्यांमुळे बलात्कार घटना घडतात, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे भाजप आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी केलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी(Priyanka Gandhi) यांनी कर्नाटकमधील हिजाबच्या मुद्द्यावर मत व्यक्त केले होते. महिलांनी काय परिधान करावे, हा त्यांचा अधिकार आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी हिजाब मुद्द्यावर ट्विट करताना म्हंटले होते की, “बिकिनी असो, बुरखा असो, जीन्स असो की हिजाब असो, तिने काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. महिलांचा छळ करणे थांबवा.” काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या या ट्विटला भाजप आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी विरोध दर्शवला आहे.

प्रियंका गांधींच्या या ट्विटवर रेणुकाचार्य म्हणाले की, “काँग्रेस सरचिटणीसांनी आपल्या वक्तव्यात ‘बिकिनी’ सारखे शब्द वापरणे हे खालच्या पातळीवरचे विधान आहे. कॉलेजमध्ये शिकताना मुलींनी पूर्ण कपडे घातले पाहिजेत. महिलांनी घातलेले काही कपडे पुरुषांना उत्तेजित करतात. त्यामुळे बलात्कार वाढत आहेत. हे योग्य नाही. कारण आपल्या देशात महिलांचा सन्मान केला जातो.”

कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी केलेल्या ट्विटवर मत व्यक्त केलं आहे. “आज प्रत्येकाला त्यांचे मत मांडायचे आहे. प्रत्येकाला ट्विट करण्याचा अधिकार आहे. पण कोण ट्विट करतो हे महत्त्वाचे नाही. ती व्यक्ती देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात बोलत आहे. त्यांनी आधी देशाचा कायदा आणि कायदेपद्धती समजून घेऊन मगच बोलावे.”

महिलांच्या कपड्यांबाबत भाजप आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. आपल्या विधानामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे लक्षात येताच भाजप आमदार रेणुकाचार्य यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. “जर माझ्या विधानामुळे आपल्या भगिनी दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यासाठी नक्कीच माफी मागेन. मी महिलांचा आदर करतो”, असे रेणुकाचार्य म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
डुग्गूच्या अपहरणकर्त्याचे पुणे पोलिसांनाच आव्हान, पोलिस चौकीपासूनच झाले होते अपहरण
‘ब्राह्मण ही जात नसून जगण्याचे उत्तम साधन आहे, जन्मापासून मरेपर्यंत सौभाग्यासाठी काम करतात’
डोळ्यात ओलावा, थरथरणारी जीभ; विरोधकांवर निशाणा साधताना मोदी झाले भावूक, म्हणाले..

राजकारण

Join WhatsApp

Join Now