करिश्माचा मोठा खुलासा म्हणाली, करिनापेक्षा सलमान माझ्याशी जास्त….

मुंबई । आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर राज करणारी ९० च्या दशकाची अभिनेत्री म्हणजेच करिश्मा कपूर. तिने अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले आहे. लग्नानंतर तिने चित्रपट क्षेत्रापासून लांब राहणे पसंत केले आहे. यामुळे ती सध्या बॉलीवूड पासून लांब आहे.

मात्र, ती सोशल मीडियावर खूप अक्टिव्ह असते. आज ही तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ती अनेक वेगवेगळ्या कामामुळे चर्चेत असते. ती पुन्हा एकदा आता चर्चेत आली आहे. तिचे कारण म्हणजे तिने केलेले एक व्यक्तव्य.

करिश्माने आपल्या आयुष्याबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे. करिश्मानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपली बहिण करिना कपूर नव्हे तर मी सलमानच्या जास्त क्लोज होतो. असे विधान तिने केले आहे.

यामुळे सलमान आणि करिश्माच्या चाहत्यांना या विधानाने धक्का बसला आहे. करिश्माचे बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्यांशी जोडले गेलेले नाव सर्वांना माहिती आहे. गोविंदा, अभिषेक बच्चन यांच्या बरोबर तिचे नाव चर्चेत होते.

आता करिश्माने सलमान आणि मी बराच काळ रिलेशनशिपमध्ये होतो असे सांगितले आहे. करिश्मा म्हणते, माझ्या बहिणीपेक्षा मी सलमानच्या जास्त जवळ होते. इंटरटेंनमेंट की रात या कार्यक्रमात तिने हा खुलासा केला आहे. त्यावेळी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची वेगवेगळी माहिती शेअर केली आहे.

सलमान आणि मी दीर्घकाळ एकमेकांना डेट करत होतो, असे करिश्माने सांगितले आहे. १९९० च्या दशकांत सलमान आणि करिश्मा यांची जोडी लोकप्रिय झाली होती. अजूनही सलमान आणि करिश्मा जर मोठ्या पडद्यावर एकत्र आले तर प्रेक्षकांना ते पाहायला आवडेल.

ताज्या बातम्या

“अनिल देशमुख व अनिल परब केवळ प्यादी, खरे सूत्रधार तर ‘सिल्व्हर ओक’वर आणि ‘वर्षा’वर बसलेत”

‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही’, म्हणत कंगनाने दिग्दर्शकाला दाखवला थेट बाहेरचा रस्ता

काळजी वाढली! महाराष्ट्र या ठिकाणी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जाणून घ्या सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.