काका ऋषी कपूरसोबत रोमान्स करण्याचा हट्ट करून बसली होती करिश्मा; त्यांनी दिला ‘हा’ सल्ला

कपूर कुटुंबाला बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान आहे. गेले अनेक दशके कपूर कुटुंबाचे सदस्य लोकांचे मनोरंजन करत आहेत. करिश्मा कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे जिने बॉलीवूडमध्ये काम करून त्यांच्या कुटुंबाचे नियम तोडले होते.

करिश्मा कपूरने प्रेम कैदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. या चित्रपटानंतर करिश्माला इंडस्ट्रीतून अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण तिला मात्र कपूर कुटुंबाच्या होम प्रोडक्शनमध्ये काम करायचे होते.

याच कालावधीमध्ये राज कपूर हिना चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटात ऋषी कपूर, अश्विनी भावे, मंदाकिनी मुख्य भुमिकेत काम करत होत्या. राज कपूर चित्रपटाची सगळी काम बघत होते.

करिश्माने तिच्या आजोबांना या चित्रपटात काम करण्याची इच्छा जाहीर केली. पण त्यांनी मात्र सरळ सरळ नकार दिला. तरीही करिश्मा एकायला तैयारी नव्हती. शेवटी त्यांनी होकार दिला पण ऋषी कपूरला विचारायला सांगितले.

ऋषी कपूरने मात्र या गोष्टीला नकार दिला. त्यांनी करिश्माला समजावून सांगितले की, ‘मी या चित्रपटात मुख्य भुमिका करत आहे. त्यामुळे तु माझी मुख्य अभिनेत्री बनू शकत नाही. कारण मी तुझा काका आहे. आपण एकत्र काम करू शकत नाही’.

त्यांनी करिश्माला मेहनत करण्याचा सल्ला दिला. करिश्माला ऋषी कपूरचे हे म्हणणे पटले. त्यामुळे तिने हिना चित्रपटात काम करण्याचा हट्ट सोडून दिला. तिने बॉलीवूडमध्ये मेहनत करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या चित्रपटांसाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली.

महत्त्वाच्या बातम्या –

बापरे! टेलिव्हिजनवरील सर्वात महागडा कॉमेडीयन आहे कपिल शर्मा; जाणून घ्या एकूण प्रॉपर्टी

तारक मेहता मालिकेतील अभिनेत्याला सोनसाखळी चोरी प्रकरणी अटक; चोरीचे कारण ऐकून धक्का बसेल

मृत्यूपूर्वी दिव्या भारतीने केल्या होत्या ‘ह्या’ गोष्टी; जाणून आश्चर्य वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.