त्याने मित्रांसमोर माझी….; करीश्मा कपुरने घटस्फोटानंतर केला होता धक्कादायक खुलासा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीश्मा कपुर जितक्या तिच्या करीयर विषयी चर्चेत असते, तितक्याच वेळेस ती तिच्या खाजगी आयुष्याविषयी पण चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने आणि आपल्या अभिनयाने तिने ९० च्या दशकात चाहत्यांना भुरळ घातली होती.

तसेच करीश्माच्या अभिनयामुळे तिने अनेक चित्रपट सुपरहीट दिले आहे. पण ती तिच्या खाजगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत होती. करीश्माने लग्न केलं होतं पण ते जास्तकाळ टिकू शकले नाही. तिने अनेकदा मुलाखतींमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत.

करीश्मा आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न होणार होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता, पण ऐनवेळी त्यांचे लग्न रद्द झाले. त्यानंतर करीश्माने २००३ मध्ये लग्न केले. तिने व्यवसायिक संजय कपुरसोबत लग्न केले होते. मात्र हे लग्न टिकू शकलं नाही आणि ११ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर करीश्माने मुलाखतीत संजयबाबत खुलासा केला होता.

माझी सासू माझ्यावर हात उचलत होती. माझा नवरासुद्धा मला मारहाण करत होता. मी नेहमी माझ्या जखमा माझ्या मेकअपच्या खाली लपवण्याचा प्रयत्न करायचे. तसेच त्याने त्याच्या मित्रांसमोर माझी बोली लावली होती.

आम्ही जेव्हा आमच्या हनिमुनला गेलो होतो, तेव्हा त्याने त्याची मित्र बोलावली होती. तसेच मला त्यांच्यासोबत रात्र घालवण्यासाठी जबरदस्ती केली होती. पण जेव्हा काही गोष्टी वाढ गेल्या, तेव्हा मी लगेच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, असा धक्कादायक खुलासा करिश्माने कपुरने केला होता.

तसेच रणधीर कपुर यांनी सुद्धा एका मुलाखतीत करीश्माच्या लग्नावर भाष्य केलं होतं. संजयचे आणि करीश्माचे लग्न व्हावे,अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. तो माणूस कसा आहे, हे पुर्ण दिल्लीला माहित आहे. आमच्या कुटुंबाला पैशाच्या पळण्याची गरज नाही, तर आमच्याकडे पैसाही आहे आणि कलाही, असे रणधीर कपुर यांनी म्हटले होते.

तसेच कोर्टात केस गेल्यानंतर संजयनेच करीश्मा कपुरवर आरोप केला होता. करीश्मा ही चांगली आई नाही. तिने फक्त पैशांसाठी माझ्याशी लग्न केले होते, असे संजयने कोर्टात म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

..आणि बच्चू कडू वेशांतर करून पोहोचले शासकीय कार्यालयात, पुढे काय झाले वाचा..
धक्कादायक! पत्नीच्या ‘या’ मागणीला कंटाळून वनरक्षकाने वडाच्या झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
पतीने पत्नीचे अश्लिल विडिओ केले शूट, पोलिसांनी मोबाईल उघडताच धक्कादायक प्रकार आला समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.