एकेकाळी ज्या अभिनेत्याला करिष्माने हाकलून दिले होते तो पुढे जाऊन बाॅलीवूडचा स्टार झाला

बॉलीवूडमध्ये कलाकारांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासोबतच त्यांना खुप जास्त मेहनत देखील करावी लागते. पण हे सर्व करताना त्यांना अनेक वेळा मोठ्या कलाकारांच्या रागाचा सामना करावा लागतो.

बॉलीवूडमध्ये असा एक अभिनेता आहे ज्याने करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना केला होता. पण आज तो बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्याचे आज लाखो चाहते आहेत.

हा किस्सा आहे ९० च्या दशकातील. त्यावेळी ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाची शुटिंग सुरू होती. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, करिष्मा कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. या तिघांनी या चित्रपटासाठी खुप जास्त मेहनत घेतली होती.

या चित्रपटाच्या एका गाण्याची शुटिंग सुरू होती. ही शुटिंग करताना करिष्मा कपूर खुप जास्त चिडली होती. कारण एका बॅकग्राऊंड डान्सरमुळे तिला परत परत रिटेक घ्यावे लागत होते. शेवटी ती त्या डान्सवर चिडली.

हा बॅक ग्राउंड डान्सर होता. सध्याचा सुपरस्टार शाहिद कपूर. शाहिद कपूरने त्याच्या करिअरची सुरुवात बॅक ग्राउंड डान्सर म्हणून केली होती. तो अनेक चित्रपटांमध्ये मागे डान्स करताना दिसतो.

दिल तो पागल है चित्रपटातील ‘ले गयी ले गयी’ या गाण्याची शुटिंग सुरू होती. या गाण्यात शाहिद कपूरला करिष्मा कपूरसोबत डान्स करायचा होता. पण शाहिद कपूर त्याच्या गाण्याच्या स्टेप्स विसरत होता.

म्हणून करिष्मा कपूरला अनेक वेळा रिटेक द्यावे लागले होते. शेवटी ती खुप चिडली. तिने शाहिद कपूरकडे बघितले. तेव्हा ती म्हणाली की, हा मुलगा कोण आहे? याला इथून बाहेर काढा. याला डान्स येत नाही’.

करिष्मा कपुरचा राग शाहिद खुप घाबरला. त्याने थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला आणि २० मिनिटे लगातार डान्सची प्रॅक्टिस केली. त्यानंतर तो सेटवर आला आणि शेवटी गाण्याची शुटिंग संपली.

तेव्हा ज्या अभिनेत्याला डान्स येत नाही म्हणून बाहेर काढले होते. भविष्यात करिष्माची बहीण त्याच मुलाच्या डान्सवर फिदा झाली होती. एवढेच नाही तर आज तोच अभिनेता बॉलीवूडच्या सर्वात उत्तम डान्सरपैकी एक आहे. तो आज बॉलीवूडचा स्टार आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारतात ड्रग्ज कायदेशीर करा; ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्याने केली धक्कादायक मागणी

रवी किशनच्या मुलीसमोर ऐश्वर्या, दिपीका पडतील फिक्या, दिसायला आहे खुपच हॉट; पहा फोटो

तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

तुम्हाला माहितीये का तोंडात विरघळणारा कबाब कसा बनवतात, जाणून घ्या रेसिपी

सैराटने अख्ख्या महाराष्ट्रात फेमस केलेला परश्या सद्या काय करतोय? पहा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.