करिश्मा कपूरचा चित्रपट पाहील्यामूळे तिच्या चाहत्याला मिळाली होती शिक्षा; रात्रभर बाहेर झोपावे लागले

९० च्या दशकातील सर्वात सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये करिश्मा कपूरचे नाव येते. करिश्माने ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर करिश्माने कधीच मागे वळून पाहीले नाही. एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या करिश्माचे आजही लाखो चाहते आहेत.

करिश्माने राजा हिंदूस्तानी, दिल तो पागल है, जुडला, कुली नं १, बीवी नं १, दुल्हन हम ले जायेंगे अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिश्माने आपली सुंदरता आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आज ती चित्रपटांपासून दुर असली तरी चाहत्यांच्या मनात करिश्मासाठी भरभरुन प्रेम आहे. तिचे चित्रपट येत नसले तरी तिचा चाहता वर्ग कमी झाला नाही. चाहते नेहमीच करिश्माला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सूक असतात. याच कारणामूळे करिश्माच्या एका चाहत्याला शिक्षा मिळाली होती. जाणून घेऊया नक्की काय आहे हा किस्सा.

९० चे दशक गाजवणाऱ्या करिश्माचे आजच्या घडीला एवढे चाहते आहेत. तर त्या काळात तर तिच्या चाहत्यांची बिलकूल कमी नव्हती. तिचे सगळे चाहते तिचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहील्या दिवशी बघणं पसंत करायचे. असाच एक चाहता होता ज्याने करिश्माचा चित्रपट पाहण्यासाठी नियम तोडले आणि त्याला शिक्षा झाली.

करिश्मा हा चाहता आज स्वत: एका अभिनेता. त्याचे नाव आहे निरहूआ. भोजपूरी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार निरहूआने करिश्माचा चित्रपट पाहण्यासाठी नियम तोडले होते. ज्यामूळे त्याला चांगलीच शिक्षा मिळाली होती. त्याने स्वत एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता.

निरहूआ आज भोजपूरी चित्रपटांचे सुपरस्टार आहेत. त्यांचा चाहता वर्ग खुप मोठा असला. लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या निरहूआ एकेकाळी करिश्मा कपूरचा खुप मोठा चाहता होता. करिश्मा कपूरवर निरहूआचे खुप प्रेम होते. करिश्माचा कोणत्याही चित्रपट निरहूआ पहील्या दिवशी बघायचे.

काहीही झाले तरी निरहूआ करिश्माचे चित्रपट पाहणे सोडत नव्हते. १९९७ मध्ये करिश्मा आणि आमिर खानचा ‘राजा हिंदूस्तानी’ चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी निरहूआ एनसीसी कॅम्पमध्ये होते. त्यामूळे हा चित्रपट पहील्या दिवशी पाहणे शक्य नव्हते.

पण जर निरहूआने हा चित्रपट पहील्या दिवशी पाहीला नाही तर मग त्यांचा पहील्या दिवशी चित्रपट पाहण्याचा रेकॉर्ड मोडला असता. त्यांना हा रेकॉर्ड मोडायचा नव्हता. म्हणून मी अनेक नियम तोडून हा चित्रपट पाहीला होता. निरहूआ कॅम्पमध्ये खोट बोलून राजा हिंदूस्तानी चित्रपट पाहण्यासाठी गेला होता.

चित्रपट पाहूण परत येता येता निरहूआला खुप उशिर झाला होता. ज्यावेळी कॅम्पमधील लोकांनी त्याला एवढा वेळ कुठे होता असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने खरे खरे सांगितले. त्याने सांगितले की, तो करिश्माचा खुप मोठा चाहता आहे आणि तिचा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता.

निरहूआचे हे खोटं समोर येताच कॅम्पमधील लोकं त्याच्यावर खुप जास्त चिडले. निरहूआच्या शिक्षकाने त्याला खुप मोठी शिक्षा दिली. तो रात्री बाहेर झोपला आणि ग्राऊंडच्या अनेक चक्कर त्याला माराव्या लागल्या. करिश्मा कपूरमूळेच निरहूआने त्याच्या चित्रपटाचे नाव ‘निरहूआ हिंदूस्तानी’ ठेवले होते आणि हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

महत्वाच्या बातम्या –
स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर तुटलेले राज बब्बर रेखाच्या प्रेमात झाले होते पागल
करोडोंच्या संपत्तीचा मालक असला तरी वडील सलीन खानचे एक स्वप्न अजूनही पुर्ण शकला नाही सलमान खान
..म्हणून मेहमूदने सगळ्यांसमोर मनोज कुमारच्या कानाखाली वाजवली होती
दीपिका पादुकोनला का वाटते राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावे? जाणून घ्या काय म्हणाली दीपिका..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.