अभिनय क्षेत्रात येण्यासाठी करिश्मा कपूरने सोडले होते तिचे शिक्षण; फक्त ‘एवढी’ शिकली आहे करिश्मा

९० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रींबद्दल बोलले जाईल. तेव्हा करिष्मा कपूरचे नाव सर्वात पहिले येते. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून बॉलीवूडमध्ये एक ओळख निर्माण केली आहे.
करिश्मा कपूरचा जन्म बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या परीवारामध्ये झाला होता.

अभिनय हा तर या अभिनेत्रीच्या रक्तातच आहे. पण तिला अभिनेत्री बनण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. कारण कपूर परीवारात एक नियम आहे. या परीवारातील मुली ह्या कधीही अभिनय क्षेत्रात काम करत नाहीत. पण करिश्माने हा नियम तोडला आणि ती बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये शामील झाली.

करिश्मा कपूरचा जन्म २५ जुन १९६८ ला झाला. करीश्मा रणधीर कपूर आणि बबीता यांची मोठी मुलगी आहे. करीना कपूर करिश्माची छोटी बहीण आहे. करिश्मा कपूरने १९९१ मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटापासून तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली.

पण अभिनय क्षेत्रात येण्यासाठी करिश्माला खुप मेहनत घ्यावी लागली होती. अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करिश्माने आपले शिक्षण अर्धवट सोडले होते. ती फक्त सहावीपर्यंत शिकली आहे. ते पण ती सहावी नापास आहे. तिने या पुढे शिक्षण घेतले नाही.

करिश्माला वाटले होते की, ती अभिनेत्री झाल्यानंतर पुढील शिक्षण पुर्ण करेल. पण ही गोष्ट शक्य होऊ शकली नाही. कारण तिच्या करिअरमध्ये एवढी व्यस्त झाली की तिला शिक्षण पुर्ण करता आले नाही. करिश्माला या गोष्टीचे काहीही दुःख नाही.

करिश्मा कपूरचा पहीला चित्रपट फ्लॉप झाला होता. पण करिश्मा कपूर कपूर परीवारातील होती. त्यामूळे तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्त त्रास झाला नाही.
या चित्रपटानंतर करिश्मा कपूरला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. त्यानंतर करिश्माचे ‘निश्चय’ आणि ‘जागृती’ हे दोन चित्रपट आले.

पण हे दोन्ही चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत. १९९२ मध्ये करिश्मा कपूरचा ‘जिगर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगन आणि करिश्मा कपूर दोघांनी काम केले आहे. हा चित्रपट यशस्वी झाला करिश्मा कपूरला अनेक चित्रपटांच्या ऑफर सुरु झाल्या.

या चित्रपटानंतर करिश्माने मागे वळून पाहिले नाही. तिने दिल तो पागल है, हिरो नं 1, जूडवा, हम साथ साथ है, बीवी नं1, दुल्हन हम ले जायेंगे, सुहाग हसीना मान जायेगी अशा चित्रपटांमध्ये काम केले आणि हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले.

या चित्रपटांंमूळे टॉपची अभिनेत्री झाली. २००३ मध्ये करिश्माने लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. आज करिश्मा चित्रपटांपासून लांब असली तरी नेहमीच चर्चेत असते. ती एकटी तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘कांटा लगा’ गाण्यातील ‘ही’ अभिनेत्री आठवते का? आज दिसते अशी तुमचा विश्वास बसणार नाही

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घेणार घटस्फोट; अभिषकने केला ‘हा’ मोठा खुलासा

विक्रम भट्टच्या प्रेमात पागल झालेल्या अमिषा पटेलने चप्पलने खाल्ला होता आईचा मार

‘बाहुबली’ चित्रपटासाठी एस.एस. राजामौलीने घेतले होते प्रभासपेक्षाही जास्त मानधन; आकडा बघून झोप उडेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.