कपूर घराण्यातील सर्वात मोठा नियम तोडून करिश्मा कपूरने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता

बॉलीवूडमध्ये अनेक मोठे कुटुंब आहेत. पण काही कुटुंब सर्वात मोठे आहेत. असेच एक कुटुंब म्हणजे कपूर कुटुंब. या कुटुंबाने बॉलीवूडला अनेक सुपेरस्टार्स दिले आहेत. पण या कुटुंबातील पहिली लेडी सुपरस्टार होती करिश्मा कपूर. बॉलीवूडमध्ये डेब्यु करणे करिश्मासाठी सोपे नव्हते.

कारण कपूर परीवारात एक नियम आहे. या परीवारातील मुली ह्या कधीही अभिनय क्षेत्रात काम करत नाहीत. पण करिश्माने हा नियम तोडला आणि ती बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाली.

करिश्मा कपूरचा जन्म २५ जुन १९६८ ला झाला. करीश्मा रणधीर कपूर आणि बबीता यांची मोठी मुलगी आहे. करीना कपूर करिश्माची छोटी बहीण आहे. करिश्मा कपूरने १९९१ मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटापासून तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली.

करिश्मा कपूरचा पहीला चित्रपट फ्लॉप झाला होता. पण करिश्मा कपूर कपूर परीवारातील होती. त्यामूळे तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्त त्रास झाला नाही.
या चित्रपटानंतर करिश्मा कपूरला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

त्यानंतर करिश्माचे ‘निश्चय’ आणि ‘जागृती’ हे दोन चित्रपट आले. पण हे दोन्ही चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत. यानंतर १९९२ मध्ये करिश्मा कपूरचा ‘जिगर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगन आणि करिश्मा कपूर दोघांनी काम केले आहे. हा चित्रपट यशस्वी झाला.

यानंतर करिश्मा कपूरला अनेक चित्रपटांच्या ऑफर सुरु झाल्या. या काळात करिश्माने अजय,अक्षय, सलमान खान गोविंदा या सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले. १९९४ मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचा ‘राजा बाबू’ हा चित्रपट रिलीज झाला.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. गोविंदा आणि करिश्माची जोडी देखील हिट झाली. कुली नं 1, जीत, साजन चले ससूराल, अंदाज अपना अपना असे अनेक हिट चित्रपट केले. करिश्माचे चित्रपट हिट होत होते.

ती खुप चांगली डान्सर म्हणून प्रसिद्ध होत होती. पण एक चांगली अभिनेत्री म्हणून करिश्माला अजूनही ओळख मिळाली नव्हती. १९९६ मध्ये करिश्मा कपूर धर्मश दर्शन दिग्दर्शित ‘राजा हिंदूस्तानी’ चित्रपटात झळकली.

हा चित्रपट सुपरहिट होता. या चित्रपटाने करिश्माला एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करुन दिली. १९९७ मध्ये करिश्माचे अजून काही चित्रपट आले. दिल तो पागल है, हिरो नं 1, जूडवा, हम साथ साथ है, बीवी नं1, दुल्हन हम ले जायेंगे, सुहाग हसीना मान जायेगी हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले.

त्यानंतर २००१ मध्ये करिश्माने ‘जुबेदा’ चित्रपटात काम केले. हा चित्रपट करिश्माच्या करिअरमधील सर्वात चांगला चित्रपट मानला जातो. करिश्माचे वैयक्तिक आयुष्य देखील या काळात चांगले सुरु होते.

करिश्मा कपूर अभिषेक बच्चनसोबत लग्न करणार होती. करिश्मा आणि अभिषेकने ‘हा मैने भी प्यार किया है’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. करिश्मा आणि अभिषेक या दोघांचा साखरपुडा झाला होता. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही.

त्यांचा साखरपुडा तुटला. यामागचे कारण कोणत्याही परीवाराने सांगितले नाही. पण हा धक्का करिश्मा कपूरला सहन नाही झाला. हा साखरपुडा तुटल्यानंतर करिश्मा कपूरने सहा महिन्यात संजय कपूरसोबत लग्न केले.

अभिषेक बच्चनसोबत लग्न तुटल्यामूळे करिश्माने करिअरकडे दुर्लक्ष केले. अभिषेकला जळवण्यासाठी करिश्माने घाईघाईने लग्न केले. हिच तिची सर्वात मोठी चुक ठरली. या चुकीमुळे करिश्मा कपूर अचानक बॉलीवूडमधून गायब झाली. टॉपवर असणाऱ्या अभिनेत्रीने अभिनय करणे बंद केले.

संजय कपूरशी लग्न केल्यानंतर करिश्मा कपूर दिल्लीला शिफ्ट झाली. तिने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. करिश्मा कपूर दोन मुलांची आई आहे.
पण २०१६ मध्ये करिश्मा कपूर आणि संजय कपूर वेगळे झाले.

त्यानंतर करिश्मा कपूरने बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. करिश्माने ‘डेंजरस इश्क’ या चित्रपटापासून कमबॅक केला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यामूळे करिश्माने चित्रपटांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.

करिश्मा कपूर सध्या तिच्या दोन्ही मुलांसोबत मुंबईत असते. ती चित्रपटांमध्ये काम करत नसली. तरी ती बॉलीवूडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये येत असते. ती बॉलीवूडमध्ये कार्यरत नसली तरी तिची प्रसिद्धी खुप जास्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

‘या’ कारणांमुळे ‘अंदाज अपना अपना’ फ्लॉप झाला होता

मिर्झापुरमधल्या कालीन भैय्याने करिअरच्या सुरुवातीला कुक म्हणून काम केले आहे

आमिर खानचा भाऊ फैजल खान याने आमिर खानवर केले गंभीर आरोप, म्हणाला..

सावधान! आपट्याची पाने म्हणून विकतात कांचनची पाने; ‘असा’ ओळखा दोन्हींतील फरक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.