गेल्या २२ वर्षांपासून सनी देओल आणि करिश्मा कपूर लढत आहेत एकच केस

फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांचे वादविवादाशी खुप जुने नाते आहे. काही प्रकरण एवढे मोठे आहेत की, त्यात कलाकारांना जेलची हवा खावी लागली होती. तर काही प्रकरण असे आहेत ज्यात कलाकार अनेक वर्ष कोर्टात केस लढत होते. जसे की, सलमानच काला हिरण प्रकरण. अनेक वर्ष सलमान यासाठी कोर्टात जात होता.

असेच एक प्रकरण अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेता सनी देओलचे आहे. दोघेही गेल्या २२ वर्षांपासून जोधपूर हायकोर्टात केस लढत आहेत. एक नाही तर असे अनेक उदाहरण आहेत. ज्यात कलाकार अनेक वर्षांपर्यत कोर्टामध्ये कायदेशीर लढाई लढत असतात.

सनी देओल आणि करिश्मा कपूरची एक केस २२ वर्ष कोर्टात सुर होती. दोघांचे वकील अनेक वर्ष राजस्थान कोर्टात केस लढत होते. २०१९ मध्ये दोघे या केसमधून निर्दोष बाहेर आले होते. २२ वर्षांपूर्वी राजस्थानच्या एका छोट्या गावातील माणसाने या दोघां विरोधाक गुन्हा दाखल केला होता.

सनी आणि करिश्मा राजस्थानमध्ये त्यांच्या एका चित्रपटाची शुटींग करत होते. दोघांच्या गाण्याच्या शुटींग ट्रेनवर होणार होती. काही सीनच्या शुटींगसाठी दिग्दर्शकांनी रेल्वे बुक केली होती. सीनच्या शुटींगसाठी चित्रपटाची पुर्ण टिम राजस्थानमध्ये पोहोचली होती.

याच शुटींग दरम्यान सनी देओल आणि करिश्मा कपूरने अचानक रेल्वे थांबवली होती. ज्यामूळे त्या गावातील लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. रेल्वेला थांबायला उशीर झाला असता तर मग गावातील काही लोकांचा जीव गेला असता.

याच कारणामूळे गावातील लोकांनी सनी देओल आणि करिश्मा कपूरवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण राजस्थान कोर्टात पोहोचले होते. २२ वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात सुरु होते. २०१९ मध्ये या केसचा निकाल लागला आणि दोघेही निर्दोष केसमधून बाहेर पडले.

बॉलीवूडमध्ये हे पहील्यांदा झाले नाही. या अगोदरही अनेक कलाकारांचे प्रकरण कोर्टात सुरु होते. कित्येक वर्ष त्या प्रकरणांचा निकाल लागला नाही. यातले सर्वात मोठे नाव म्हणजे सलमान खान. सलमानचे एक नाही तर दोन तीन केस कोर्टात सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या –
सोनम कपूरच्या लग्नात वडील अनिल कपूरला अश्रू झाले होते अनावर; रडत रडत केले होते मुलीला विदा
शारीरीक संबंधावरुन रेखाने केलेले विधान ऐकून उडाली होती लोकांची झोप; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
सुर्यवंशममधला तो नातू नक्की होता तरी कोण? वाचा सध्या तो काय करतोय
स्टारडमचा माज दाखवणाऱ्या माधूरी दिक्षितवर ‘या’ कलाकाराने केली होती कायदेशीर कारवाई; पाठवली नोटीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.