पहा सैफ- करिनाच्या बाळाची पहिली झलक; सोशल मिडीयावर फोटो होतायेत तुफान व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. २१ फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी इस्पितळात करिना कपूरने आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला.

दोन दिवसांनंतर हॉस्पिटलमधून करिनाला डिस्चार्ज देण्यात आला. स्वतः सैफ अली खान त्यांना घरी नेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. वेळी सैफ गाडी चालवत होता तर पुढच्या सीटवर तैमुर बसला होता. मागे करिना आणि बाळाला सांभाळणारी नॅनी बसली होती तर नॅनीच्या हातात चिमुकले बाळ होते.

तसेच करिना रुग्णालयातून बाहेर पडताना फोटोग्राफर्सना बाळाचे फोटो काढून देईन असे वाटले होते. मात्र करिना आणि सैफने असे काहीही न करता बाळाला गाडीत बसवले. बाळाचा चेहरा कपड्याने झाकलेला असल्याने कोणालाच सैफ आणि करिनाच्या या चिमुकल्याचा चेहरा दिसला नाही.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. करिना मुलीला जन्म देणार की मुलाला? याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता होती तर दोन दिवसांपूर्वी सैफची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले होते.

दरम्यान, २०१६ मध्ये करिना व सैफच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला होता. गत ऑगस्टमध्ये दुस-यांदा आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सैफिनाने चाहत्यांना दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या
#ArrestRamdev : फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी; WHO म्हणते…
खा. डेलकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनेक महत्त्वाच्या नावांचा उल्लेख? मृत्यू प्रकरणातलं गूढ वाढलं
खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातला गुंता वाढला! पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.