करीना कपूरने विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला म्हातारी म्हणून हिणवले; वाचा पूर्ण किस्सा

बॉलीवूडचे कलाकार सतत एकमेकांबद्दल काहीना काही बोलले ऐकायला मिळते. त्यांच्या या गोष्टीला घेऊन ते खूप ट्रोल झालेलेही पाहायला मिळतात. आज आपण अश्याच एका बॉलीवूड अक्टर्स बद्दल बोलणार आहोत जी सतत आपल्या बोलण्यावरून ट्रोल झालेली पाहायला मिळते.

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान ही बॉलिवूडची गॉसिप गर्ल म्हणून ओळखली जाते. करीना परखडपणे बॉलिवूडच्या कलाकारांबद्दलच तीच मत सांगताना दिसते. या तिच्या या वक्तव्यांमुळे ती बऱ्याच वेळा ट्रोल देखील झाली आहे.

काफी विथ करन च्या एका भागात जेव्हा बॉलिवूडच्या बेबोला बोलले की, बॉलीवूडमध्ये जे रुमर्स (अफवा) सुरु होतात त्याचे उगमस्थान कोणते आहे. तेव्हा तिने करणकडे आणि स्वतःकडे इशारा केला होता, म्हणजे तिलाही मान्य आहे की जे बॉलिवूड मध्ये कोणालाच माहिती नसते ते गॉसिप सगळ्यात पहिले तिला माहिती असते.

तिच्या गोसिपिंगचा सगळ्यात मोठा सोर्स कारण जोहर आहे. एकदा कपिल शर्मा शोमध्येही बॉलीवूडबद्दलची सगळ्यात आधी खबर कोणाला माहित असते यावर करणने करीना कपूरच नाव सांगितलेलं. अनेकांच्या हे ही लक्षात आलेलं आहे की करीना बोलताना मागचा पुढचा विचार करत नाही.

एकदा मधुर भांडारकर ह्यांनी ऐश्वर्या राय हिला काढून आपल्या ‘हिरोईन’ ह्या सिनेमामध्ये करीनाला घेतले होते. तेव्हा, करीना एका मुलाखतीच्या वेळी ह्याच विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला म्हातारी असे बोलली होती. हिरोईन ह्या चित्रपटासाठी आधी ऐश्वर्या रायला घेण्यात आलं होतं. परंतु ती गर्भवती असल्यामुळे मधुर भांडारकर ने तिला ह्या चित्रपटासाठी नकार द्यायला लावला आणि करीनाचे निवड केली.

तसेच, एकदा करीना कपूरने विद्या बालनवर सुद्धा विवाद्स्पद वक्तव्य केल होत. विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील भूमिकेवर करीनाने आपल मत मांडल होत. हा चित्रपट विद्या बालनच्या करिअर मधील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. विद्याने तिच्या या चित्रपटामधील सिल्क सिम्थ हिच्या रोलसाठी वजन वाढवल होत.

करीनाने तिच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल वक्तव्य केल होत. ‘जाडअसल्यावर कोणीच सुंदर दिसत नाही’.  आकर्षक दिसणे म्हणजे सुंदर आहे, पण जाड नाही. कोणतीही स्त्री जी बोलते की मला बारीक व्हायचं नाही, ती साफ खोटं बोलते. कारण प्रत्येक मुलीचं हे स्वप्न आहे की ती सडपातळ असावी, असं करीना म्हणाली होती. तिच्या या बोलण्यावर विद्या बालननेही तिला परखड उत्तर दिल होत.

त्यानंतर करीनाच्या या बोलण्यावर तिला भरपूर ट्रोल करण्यात आले होते. सुंदरता कोणाच्या दिसण्यावरून नसते असे ट्रोलर्स चे मत होते. आणि करीना स्वतः झिरो फिगर मध्ये असताना अजिबात चांगली दिसत नव्हती असेही तेव्हा ट्रोलर्स बोलले होते.

हे ही वाचा-

अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का?; कंगणा रणौत

रात्रीस खेळ चाले मधील अण्णा नाईक यांच्या खऱ्या पत्नी अभिनेत्रीपेक्षाही दिसतात सुंदर; पहा फोटो

अभिनेता राहूल व्होराचे ३५ व्या वर्षी कोरोनाने निधन; शेवटपर्यंत फेसबूकवरून मागत होता मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.