चाहत्यांनी तैमूरला दिला आवाज, अन् त्याने जे केले ते पाहून करीना चांगलीच संतापली, पाहा व्हिडिओ

मुंबई | बॉलिवूडमधील फेमस जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. २१ फेब्रूवारी रोजी सैफ आणि करीनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यांना तैमूर नावाचा एक मुलगा आहे. तैमूरचे सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. तैमूरचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर धूमाकूळ घालत आहे.

अभिनेत्री करीना कपूर मुलगा तैमूरला आणि आई बबीताला घेऊन करिश्मा कपूरच्या मुलीच्या बर्थ डे पार्टीला गेली होती. तिथे तैमूर आणि करीना कारमधून उतरताच चाहत्यांनी करिनाला आणि तैमूरला आवाज देण्यास सूरूवात केली. त्यानंतर करीनाने चाहत्यांना फोटो काढण्यासाठी पोझ दिली.

करीना पाठोपाठ तैमूरही कारममधून खाली उतरला आणि तो फोटो काढणाऱ्या चाहत्यांवर चांगलाच भडकला. तैमूर मोठ्याने ओरडून तिथून निघून जात असतानाचं समोरील प्रवेशद्वाराच्या काचेवर जाऊन धडकला. त्यानंतर करीना तैमूरच्या अशा वागण्यावर नाराज होते. करीनासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तैमूरच्या हाताला धरून त्याला आतमध्ये नेले. सोशल मिडियावर सध्या तैमूरचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

अभिनेता सैफ अली खानने २०१२ मध्ये करीना कपूर सोबत लग्न केले होते. करीना कपूर सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. बॉलिवूडमध्ये करीना आणि सैफ यांच्या जोडीला ‘सैफिना’ नावाने ओळखले जाते. लग्नाच्या चार वर्षानंतर त्यांनी तैमूरला जन्म दिला होता.

करीना कपूरने कभी खुशी कभी गम, तलाश, हलचल, बेवफा, ऐतराज, चुप चुप के, बॉडिगार्ड, सिंघम रिटर्न्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
काय म्हणावं या शाॅटला, ही नवी पिढी बिनधास्त; रिषभ तुला तर हॅट्स ऑफ
रिषभ पंतने जोफ्रा आर्चरला मारलेला डोळ्याचं पारणं फेडणारा रिव्हर्स स्विपचा षटकार पाहीलात का?
…तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली की, “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला”
प्रियंका चोप्राने ट्रान्सपरंट ड्रेस घालून उडवली चाहत्यांची झोप; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.