फिल्म इंडस्ट्रीमध्ये वर्षानुवर्षे अभिनेत्रींमध्ये भांडण होत आहेत. कितीही वर्षे झाली तरी अभिनेत्रींचे भांडण संपत नाहीत. अनेकदा या भांडणांमूळे अभिनेत्री एकमेकींचे करिअर खराब करतात. असेच भांडण अमिषा आणि करीना कपूरमध्ये झाले होते.
आमिषा पटेलने ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. म्हणून आमिषा पटेल रातोरात सुपरस्टार झाली होती. आमिषा खुप जास्त प्रसिद्ध झाली होती.
या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. तिचे अनेक चित्रपट हिट होत होते. आमिषाला मिळालेल्या स्टारडममूळे बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींची झोप उडवली होती. अशीच एक अभिनेत्री म्हणजे करीना कपूर.
करीना कपूर आणि आमिषा पटेलच्या भांडणांबद्दल सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला माहिती होते. कारण दोघींनी एकाच वेळी बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. पण आमिषा खुप कमी वेळात स्टार झाली होती. तर करीना अजूनही त्यासाठी मेहनत करत होती.
पहिल्याच चित्रपटापासून या दोघींमध्ये वैर होते. करीना राकेश रोशनच्या कहो ना प्यार है चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार होती. पण त्यावेळी कारीनाने आई बबीताच्या सांगण्यावरून या चित्रपटात काम करायला नकार दिला होता.
त्यानंतर या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून आमिषा पटेलला घेण्यात आले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. म्हणून आमिषा रातोरात सुपरस्टार झाली होती. ही गोष्ट करीनाला आवडली नाही. त्यामुळे तिने आमिषाचे करिअर खराब करण्याचा निर्णय घेतला.
२००५ मध्ये आमिषा पटेल ‘दोस्ती फ्रेंडस फॉरेव्हर’ चित्रपटात काम करत होती. आमिषासोबतच या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल आणि लारा दत्ता काम करत होते. ही गोष्ट ज्यावेळी करिनाला समजली त्यावेळी तिला खुप राग आला.
कारण आमिषा खुप मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करत होती. तिने दोस्ती चित्रपटाच्या निर्मात्यांना फोन केला आणि मला या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. असे सांगितले. पण निर्मात्यांनी त्या गोष्टीला नकार दिला. कारण आमिषाने हा चित्रपट साइन केला होता.
शेवटी करीना चित्रपटाच्या निर्मात्यांना भेटायला गेली. तिने निर्मात्यांना सांगितले की, ‘मी या चित्रपटात पैसे न घेता काम करायला तयार आहे. तुम्ही आमिषाला चित्रपटातून काढा आणि मला चित्रपटात घ्या’. निर्मात्यांना पैसे वाचवायचे होते. म्हणून त्यांनी या गोष्टीला होकार दिला.
करीनाच्या सांगण्यावरून आमिषाला चित्रपटाची शुटिंग सुरू झाल्यानंतर चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. ही गोष्ट आमिषाला समजली तेव्हा ती खुप चिडली. पण ती काहीही करू शकत नव्हती. कारण करीना बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या कुटुंबातील आहे.
करीना कपूरला आमिषा पटेलचे करिअर खराब करायचे होते. म्हणून तिने पैसे न घेता चित्रपटामध्ये काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यासोबतच आमिषाचे करिअर देखील खराब झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
या’ अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते सोनाली बेंद्रेचे नाव; एक तर होता विवाहित
महावीर शाह एक असे अभिनेते ज्यांच्या मृत्यूने सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता
प्रीती झिंटामूळे झाला होता सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट
साध्या भोळ्या अजय देवगनचे होते अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर; पहा कोण आहेत त्या