सैफ अली खानच्या घरी बाप्पा विराजमान; तैमुरने स्वत:च्या हाताने बनवलेल्या मुर्तीचे सर्वत्र कौतुक

देशभरात सर्वत्र बाप्पांचे आगमन झाले आहे. सर्वसामान्य लोकांच्या तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. करीना कपूर, तैमूर अली खान आणि सैफ अली खान यांनी देखील गणेश चतुर्थी साजरी केली आहे.

याचे फोटोज करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे फोटोजमध्ये असणारी मुर्ती तैमूरने बनवली आहे. त्यामुळे इंस्टाग्रामवर अनेकांनी या मुर्तीचे कौतुक केले आहे. करीना कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर तीन फोटोज शेअर केले आहे.

पहिल्या फोटोमध्ये ती तैमुरला बाप्पासमोर हात जोडण्यास सांगत आहे. दुसऱ्या फोटोजमध्ये तैमुरने बनवलेल्या मातीच्या मूर्तींचे फोटो शेअर केले आहे. आणि तिसऱ्या चित्रात सैफ अली खान आणि तैमूर दोघेही गणपती बाप्पांसमोर हात जोडून प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे.

करीनाने गणपती पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या खूप व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये, सैफ अली खान, करीना सोबत, त्यांचा मुलगा तैमूर देखील आहे, जो पूर्ण भक्तीसह बाप्पासमोर हात जोडून उभा आहे.

तैमूरने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मुर्तीचे इंस्टाग्रामवर अनेकांनी कौतुक केले आहे. हे फोटो ४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले असून अनेकांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अलीकडेच करीना कपूर आणि सैफ अली खान त्यांनी ठेवलेल्या त्यांच्या मुलांच्या नावावरून चर्चेचा विषय बनले आहे. अनेकांनी त्यांच्या नावावरून त्यांना ट्रोलही केले आहे.

नुकताच सैफ अली खानचा ‘भूत पोलीस’ हा चित्रपट डिस्ने+हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी काम केले असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

 

महत्वाच्या बातम्या
भाजप सरकारमुळेच लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वतींची शक्ती कमी झाली – राहूल गांधी

विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेणार? रोहीतसह ‘ही’ नावेही नव्या कर्णधारासाठी शर्यतीत
तारक मेहता शोच शुटींग थांबलं! दोन कलाकारांची तब्येत बिघडल्याने निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय….
राहूल गांधी समुद्रात पोहले, त्यांनी पुशअप्स मारले, त्यांचा शर्ट घामाने भिजला की भक्तांना घाम का फुटतो?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.