मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये अतिशय आनंदानं कपूर आणि खान परिवारानं त्यांच्या बाळाचे स्वागत केले आहे.
आई व बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे कळतेय. गोड बातमी कळताच करीना आणि नवाबांच्या कुटुंबातील सैफ अली खानवर सोशल मीडियापासून ते अगदी मित्रमंडळींच्या वर्तुळापर्यंत सर्वच ठिकाणहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहेत.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. करिना मुलीला जन्म देणार की मुलाला? याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता होती तर दोन दिवसांपूर्वी सैफची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले होते.
दरम्यान, २०१६ मध्ये करिना व सैफच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला होता. गत ऑगस्टमध्ये दुस-यांदा आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सैफिनाने चाहत्यांना दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
पोटाचा घेर वाढला तर रोमान्स होत नाही यार; राखी सावंतचा शॉकिंग दावा
सोलापूरच्या तरुणाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनोखी ट्रॅक्टर सेवा; वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ…