करीनाच्या बाळाचा जन्म होताच ‘औरंगजेब’, ‘बाबर’ ट्रेंडमध्ये; जाणून घ्या कारणं

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये अतिशय आनंदानं कपूर आणि खान परिवारानं त्यांच्या बाळाचे स्वागत केले आहे.

आई व बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे कळतेय. गोड बातमी कळताच करीना आणि नवाबांच्या कुटुंबातील सैफ अली खानवर सोशल मीडियापासून ते अगदी मित्रमंडळींच्या वर्तुळापर्यंत सर्वच ठिकाणहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहेत.

तर दुसरीकडे करीनाला तिच्या बाळाच्या नावामुळं ट्रोल केले जात आहे. करीनाच्या पहिल्या मुलाच्या नावावरून करीना आणि सैफला काही नेटकऱ्यांनी चांगलेच निशाण्यावर घेतले आहे. धाकट्या मुलाचं नाव ‘औरंगजेब’ किंवा ‘बाबर’ असं ठेवावं असे म्हणत उपरोधिक टीका करत आहे.

याचबरोबर सैफिनाच्या बाळाचे नाव काय असेन, याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. बेबो आपल्या दुस-या मुलाचे नाव काय ठेवणार? हे जाणून घेण्यास चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र तूर्तास तरी बेबो बाळाच्या नावाचा खुलासा करणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

२०१६ मध्ये पहिल्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याचे जाहिर करताच करिना व सैफ मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. तैमूर या नावावरून वादही निर्माण झाला होता. या कारणामुळेच सैफिना यावेळी बाळाचे नाव जाहिर करताना सतर्कता बाळगणार असल्याचे समजते आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नवा स्ट्रेन कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा करु शकतो बाधित; एम्स प्रमुखांनी दिला इशारा
‘पूजाला यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयातच मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं’
एक दिवस त्याला भेटण्याची संधी मिळो…! चिमुकल्याचा आवाज ऐकून शंकर महादेवनही भारावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.