खरं की काय! लग्नाआधी सैफ अली खानला करीनाने दिला होता ‘इतक्या’ वेळा नकार

मुंबई | बॉलिवूडमधील सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आवर्जुन करिना कपूरचे नाव आवर्जुन घेतले जाते. करिनाने आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय आपल्या मनाचे ऐकून घेतले आहेत. मग तो एखाद्या सिनेमाला होकार देणे असो किंवा सैफ अली खान सोबत लग्न करणे असो.

तसेच २०१२ मध्ये सैफ आणि करिनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करीना २०१६ साली पहिल्यांदा आई बनली. तैमूर आता जवळपास साडेतीन वर्षांचा झाला आहे. मात्र करीनाने लग्नाआधी सैफ अली खानला किती वेळा नकार दिला? हे अजून अनेकांना माहिती नाहीये.

तर जाणून घेऊयात सैफ अली खान आणि करीनाची प्रेमकहाणी. ‘२००८मध्ये ‘तशन’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दोघांचे सूत जुळले. पण सैफला या नात्यासाठी हो म्हणण्यापूर्वी करिनाने त्याला दोनदा नकार दिला होता.

यासंदर्भात करिनाने मीडियाशी बोलताना सांगितले, ‘खरं तर, सैफने पॅरिसमध्ये दोन वेळा मला प्रपोज केले होते. पहिल्यांदा त्याने एका बारमध्ये प्रपोज केले होते. मला वाटतं आपण लग्न केलं पाहिजे असे सैफ त्यावेळी बोलला असल्याचे करीनाने सांगितले आहे.

तसेच या मुलाखतीदरम्यान करीनाने सैफला लग्नासाठी का नकार दिला याचे कारण देखील सांगितले आहे. ‘सैफला मला अधिक जाणून घ्यायचे होते, असे करीनाने म्हंटले आहे. याचबरोबर करीना आज तिच्या या निर्णयाला सर्वोत्कृष्ट मानते.

दरम्यान, करीना आणि सैफ अली खानच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सैफने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीना आणि सैफचा मुलगा तैमुर लवकरच आता दादा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर महेश भट व मुकेश भट यांनी मांडली त्यांची बाजू; म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.