सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे ‘कारभारी लयभरी’ मालिकेची. या मालिकेला सुरू होऊन अवघे काही आठवडेच झाले आहेत. पण तरीही ही मालिका टेलिव्हिजनवर राज्य करत आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे.
या मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षक खुप पसंत करत आहेत. मालिकेत अभिनेता निखिल चव्हाण मुख्य भुमिका साकारत आहे. निखिलने या अगोदर ‘लागिर झालं जी’ मालिकेत काम केले आहे. जाणून घेऊया निखिल चव्हाणबद्दल.
निखिलचा जन्म २९ मै १९९२ मध्ये पुण्यात झाला. झी मराठीवरील ‘लागिर झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या विक्याने चित्रपटांतून देखील वेगळी ओळख निर्माण करत आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा अनेक माध्यमांतून तो त्याच्या अभिनयाची जादू दाखवत आहे.
कुठल्याही कलाकाराचा प्रवास सरळ आणि सोपा नसतो. तसेच काही निखिलचे होते. त्याच्या शिकण्याची धडपड त्याला इथपर्यंत घेऊन आली. आजारी असल्यामुळे निखिल बारावीत नापास झाला होता. त्यामुळे त्याच्या आयुष्याला नवे वळणं मिळाले.
बारावीची परीक्षा देत असताना त्याला एकांकिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्याला अभिनयात रुची निर्माण झाली होती. त्याने शिक्षण पुर्ण करण्यासाठी पुणे विद्यापीठात ऍडमिशन घेतले. पण दुसरीकडे तो नाटकांमध्ये काम करत होता.
तो अनेक वेळा नाटकांमध्ये बॅक स्टेजला लाईटचे काम करायचा. याच कालावधीत त्याने ‘थ्री चिअर्स’ नाटकात काम केले. त्याचे हे नाटक यशस्वी झाले आणि तो नाटकातील प्रसिद्ध चेहरा झाला. त्यानंतर त्याने मधू इथे आणि चंद्र तिथे, अवताराची गोष्ट या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका केल्या.
या चित्रपटांनंतर त्याला काम मिळत नव्हते. म्हणून त्याने प्रोडक्शनकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत त्याला तेजपाल वाघ यांनी संधी दिली. या संधीचे त्याने सोनं केले. त्याला झी मराठीची लागिर झालं जी मालिकेत काम मिळाले.
लागिर झालं जी मालिकेने तो सगळीकडे प्रसिद्ध झाला होता. त्याला घराघरात ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर निखिलने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो अभिनय क्षेत्रात पुढे पुढे जात होता. निखिलने ‘अट्रोसिटी’ चित्रपटात नकारात्मक भुमिका केली.
निखिलने ‘स्त्रीलिंगी पुलिंग’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. त्याच्या या वेबसीरिजला लोकांनी खुप चांगला प्रतिसाद दिला. सध्या निखिल झी मराठीच्या ‘कारभारी लयभारी’ मालिकेत महत्त्वाची भुमिका साकारत आहे. त्याच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी देखील खुप जास्त पसंत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ महिला क्रिकेटरने विराट कोहलीला सगळ्यांसमोर लग्नासाठी प्रोपोज केले होते पण…
जाणून घ्या कोण आहे कंगना राणावतसोबत ट्वीटरवर वॉर करणारा दिलजीत दुसांज
‘आशिकी’ फेम अभिनेता राहूल रॉयवर बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या फिदा
जाणून घ्या ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेतील सुमन नक्की कोण आहे?