मंगळवारी हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे . हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, तसेच हिजाब हा इस्लामियांचा अविभाज्य भाग ही नाही, असे कर्नाटक न्यायालय म्हणाले आहे. न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदी विरोधात आवाज उठविणाऱ्या विविध याचिकांना फेटाळून लावले आहे.(karanatak high court banned hizab from school and college)
मध्यंतरी हिजाब वादावरून संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. राज्यात निर्माण झालेल्या या वादामुळे जिल्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते. यादरम्यान २१ मार्चपर्यंत बंगळूरमध्ये सर्व प्रकारचे मेळावे, आंदोलने आणि उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्याच्या डीसींनी १५ मार्च रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी बोलताना दक्षिण कन्नडचे डीसी डॉ. राजेंद्र केव्ही म्हणाले की, या निकालामुळे त्या दिवशी असणाऱ्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या अंतर्गत परीक्षा पुढे ढकलण्यात येतील.
हिजाबच्या वादावर मंगळवारी आलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री ८ ते 19 मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था या दिवशी बंद राहणार आहेत. हिजाब प्रकरणी मुलींनी कर्नाटक हायकोर्टात जाऊन हिजाब परिधान करुन वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी केली होती.
कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब वरून वाद सुरु झाला होता. या महाविद्यालयात हिजाब घालून येणाऱ्या मुलींना प्रवेश नाकारण्यात आला होता. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडच्या नियमानुसार महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी काही मुस्लिम मुलींना महाविद्यालयात हिजाब घालून येण्यास विरोध केला होता.
यावर महाविद्यालयांतील मुस्लिम मुलींनी या निर्णयाला विरोध करत निदेर्शने केली होती. तसेच पालकांनी देखील याविरोधात आंदोलन केलं होतं. त्याचवेळी काही हिंदू विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून या मुलींचा विरोध केला होता. यावरून हा वाद आणखीनच चिघळला होता. त्यानंतर या प्रकरणात राजकीय पक्षांनी देखील भाग घेतला होता.
महत्वाच्या बातम्या :-
टाटा ग्रुपचे ‘हे’ चार शेअर्स आहेत राकेश झुनझुनवालांचे आवडते शेअर्स, देणार बक्कळ परतावा
मोठी बातमी! हायकोर्टाने हिजाबबंदी विरोधातील याचिका फेटाळली
‘द काश्मीर फाइल्स’ चे कौतुक करताना कंगनाने बॉलीवूडला फटकारले; म्हणाली, आता सगळे शांत का?