करण जोहरच्या एकूण संपत्तीचा आकडा वाचून तुमची झोप उडेल; आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक

बॉलीवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर आज ४९ वर्षांचे झाले आहेत. करण जोहरला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक नावांनी ओळखले जाते. इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या निर्मात्यांपैकी एक जोहर करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. ते इंडस्ट्रीतील स्टार्सच्या पार्टीमूळे अनेकदा चर्चेच असतो.

करण जोहर एकमेव असा निर्माता आहे. जो बॉलीवूडच्या स्टार्ससाठी मोठ्या मोठ्या पार्टीचे आयोजन करत असतो. पण यावेळेस कोरोनामूळे करण जोहर मुंबईत नाही तर मुंबईच्या बाहेर वाढदिवस साजरा करणार आहे. असे बोलले जाते की, करणच्या अलिबागच्या फार्म हाऊसमध्ये त्याचे वाढदिवसाचे सेलिब्रेशन तीन दिवस चालणार आहे. ज्यात अनेक मोठे स्टार्स येणार आहेत.

२५ मे १९७२ ला करणचा जन्म निर्माते यश जोहर आणि हिरु जोहरच्या घरी झाला होता. आज करण ज्या धर्मा प्रोडक्शनला हॉलीवूडपर्यंत नेऊन पोहोचवले आहे. त्याची सुरुवात यश जोहरने केली होती. वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी करणने कोणतीही कमी सोडली नाही.

एक काळ असा होता ज्यावेळी करण त्याच्या वडीलांबद्दल कोणालाही सांगत नव्हता. तो कॉलेजमध्ये मित्रांना सांगायचा की त्याचे वडील बिजनेस मॅन आहे. पण अग्निपथ चित्रपटाच्या रिलीज झाल्यानंतर मात्र त्याने गर्वाने सगळ्यांना सांगितले की, त्याचे वडील निर्माते आहेत.

आज इंडस्ट्रीतील सर्वात महागडा निर्माता करण जोहरने त्याच्या करिअरची सुरुवात आसिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती. दिलवाले दुल्हनिया चित्रपटातून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. आज तो इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी निर्माता आहे.

करणचे त्याच्या वडीलांवर खुप जास्त प्रेम आहे. त्यामूळे त्याने त्याच्या मुलाचे नाव वडीलांच्या नावावरुन ठेवले आहे. तर मुलीचे नाव आईच्या नावावरुन ठेवले आहे. करणने लग्न केले नाही. तो सिंगल फादर आहे. पण तरीही अतिशय उत्तम पद्धतीने तो मुलांचा सांभाळ करतो.

इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंतर निर्माता करण जोहर एकूण १४५० करोडचा मालक आहे. त्यासोबत त्याचे अनेक बंगले आणि फ्लॅट भारतासोबतच भारता बाहेर देखील आहेत. त्यासोबतच त्याला महागड्या गाड्यांची आवड आहे. लाखापासून ते करोडो रुपयांच्या किंमतीच्या गाड्या त्याच्याकडे आहेत.

महत्वाच्या बातम्या –
अक्षय खन्ना आजही आहे अविवाहित, कारण आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या…
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; मुंबईतच आहेत दोन आलिशान बंगले
दिशा वाकानी अर्थात जुन्या दयाबेनला विसरून जातील सगळे! शोमध्ये येणार नवीन चेहरा, सोबत अनेक ट्वीस्ट
पैशांसाठी जुही चावलाने केले होते जय मेहतासोबत लग्न?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.