नेपोटिझम किंग करण जोहर परत एकदा स्टार किडला करणार लॉन्च; जाणून घ्या कोण आहे ती स्टार किड

करण जोहरला बॉलीवूड इंडस्ट्रीतील नेपोटिझम किंग बोलले जाते. करण जोहरने आत्तापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक मोठ्या कलाकारांच्या मुलांना लॉन्च केले आहे. आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, अनन्या पांडे यांसारखे अनेक स्टार किडला त्याने बॉलीवूडमध्ये लॉन्च केले आहे.

आत्ता करणने आणखी एका स्टार किडला इंडस्ट्रीमध्ये लॉंच करण्याची घोषणा केली आहे. ही स्टार किड दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेते संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आहे. करणच्या या निर्णयाने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

कारण गेल्या अनेक दिवसांपासून करण जोहर स्टार किड्सपासून दुर राहत होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर लोकं करणवर खुप जास्त भडकले होते. लोकांनी त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामूळे तो स्टार किड्सपासून दुर राहत होता.

एवढेच नाही तर त्याने सोशल मिडीयावर देखील स्टार किड्सला अनफॉलो केले होते. त्यामूळे लोकांना तो सुधारला आहे. असे वाटत होते. पण आत्ता परत एकदा करण स्टार किडला लॉंन्च करणार आहे. त्यामूळे लोकं त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत.

करण जोहरच्या कंपनीने नवीन स्टार किडला लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या अगोदर करणच्या टिमने नवीन चेहऱ्यांना लॉन्च करण्याची घोषणा केली होती. पण त्यांनी परत एकदा स्टार किडच्या नावाची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर व्हिडीओ शेअर करत कंगनाने चाहत्यांना दिली गुड न्यूज; पहा व्हिडीओ

चाहत्याने जान्हवी कपूरकडे केली नको ती मागणी; जान्हवीचे उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

….म्हणून अमिताभ बच्चनचे पाय पकडून रडत होती करिना कपूर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.