सततच्या ट्रोलिंगमुळे करण जोहर खचला असून तो सतत रडत आहे; करणच्या मित्राचा खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर सुशांतच्या चाहत्यांनी घराणेशाहीचा कडाडून विरोध केला आहे. नेटकऱ्यांनी या वादावरून निर्माता आणि दिगदर्शक करण जोहरला वेठीस धरले आहे.

त्याची सतत ट्रोलिंग सुरू आहे. त्यामुळे करण जोहर पूर्णपणे खचला असून सतत रडत आहे. करणच्या एका जवळच्या मित्राने हा खुलासा केला आहे.

बॉलीवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे. करणवर आणि अनन्या पांडेवर ट्रोलिंगचा कसा परिणाम झाला आहे हे तो सांगत होता.

सुशांतच्या आत्महत्येनंतर होत असलेल्या ट्रोलिंगने करण पूर्णपणे हादरला आहे. त्याच्या तीन वर्षांच्या जुळ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या सर्व गोष्टींचा त्याच्यावर खूप परिणाम होत आहे.

अनन्या पांडेला लोक आत्महत्या कर असं म्हणत आहेत. असे मेसेज वाचुन ती सुद्धा खचली आहे. करणला जेव्हा मी फोन करतो तेव्हा तो मला बोलतो की, याच्यात माझी काय चूक आहे असं तो म्हणतो. असं करणच्या मित्राने सांगितले आहे.

दरम्यान, सोशल मीडियाच्या या ट्रोलिंगमुळे करणचे बरेच फॉलोवर्स कमी झाले आहेत. त्यानेही बऱ्याच लोकांना अनफॉलो केले आहे. आणि सगळ्या पोस्ट वरच्या कॉमेंट्स म्युट केल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.