पहा अभिनेत्री लारा दत्ताच्या आलिशान घराचे फोटो; करोडो रुपये खर्च करुन सजवले आहे घर

बॉलीवूडची ब्यूटी क्वीन लारा दत्ता ४३ वर्षांची झाली आहे. १६ एप्रिल १९७८ मध्ये उत्तरप्रदेशमध्ये जन्मलेल्या लाराने २००० मध्ये मिस युनिवर्सचा ताज जिंकला आणि सगळ्या जगात भारताचे नाव केले. त्यानंतर तीन वर्षांनी तिने अंदाज चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला.

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले. पण काही खास यश तिला मिळाले नाही. पार्टनर, भागमभागसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले. पण ती तिला दुसऱ्या अभिनेत्रींप्रमाणे नाव कमवता आले नाही. त्यामूळे खुप कमी वेळात ती इंडस्ट्रीतून गायब झाली.

प्रोफेशनल आयूष्यापेक्षा लारा तिच्या वैयक्तिक आयूष्यामूळे जास्त चर्चेत होती. लाराने प्रसिद्ध टेनिस खेळाडू महेश भुपतीसोबत लग्न केले. महेश अगोदरपासूनच विवाहीत होती त्यामूळे तिला लोकांच्या अनेक वाईट गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. लाराला होम ब्रेकर देखील बोलले गेले.

पण या सर्व गोष्टींचा परिणाम लारा आणि महेशच्या नात्यावर झाला नाही. ज्यावेळी लारा आणि महेशची भेट त्यावेळी महेश श्वेता जयशंकरसोबत विवाहीत होता. श्वेताने लारावर तिचे घर तोडल्याचा आरोप केला होता. पण लाराने या सगळ्या गोष्टींकडे दुलर्क्ष केले.

२०११ मध्ये लाराने टेनिस खेळाडू महेश भुपतीसोबत लग्न केले. लग्नानंतर लाराला सायरा नावाची मुलगी झाली. दोघेही आपल्या कुटूंबासोबत आनंदी आहेत. महेश टेनिसमधले प्रसिद्ध नाव आहे तर लाराने फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव केले आहे. त्यामूळे दोघेही पावर कपल समजले जातात.

संपत्तीच्या बाबतीतही लारा राणी आहे. ती आणि महेश करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. दोघे दोन मोठ्या घरांचे मालक आहेत. त्यांचे एक घर मुंबईत आहे. तर दुसरे घर गोव्याला आहे. अनेकदा ते मुलगी सायरासोबत गोव्यातील घरामध्ये राहायला जात असतात.

लाराने दोन्ही घरांच्या सजावटीसाठी खुप मेहनत घेतली आहे. करोडो रुपये खर्च करुन तिने बाहेर देशातून घराच्या सजावटीसाठी काही गोष्टी मागवल्या आहेत. ज्यामूळे तिच्या घराला खुपच सुंदर लुक मिळाला आहे. मुंबईतील घरासोबतच तिने गोव्यातील घरावर देखील खुप मेहनत घेतली आहे.

लारा आणि महेशचे गोव्यातील घर खुपच सुंदर आहे. लाराने तिच्या या घराची सजावटी जुन्या पद्धतीने केली आहे. ज्यामूळे घराचा लुक खुप सुंदर वाटतो. लारा तिच्या घराते आणि कुटूंबाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. ती चित्रपटांपासून दुर आपल्या कुटूंबासोबत आनंदी आहे.

महत्वाच्या बातम्या –

कॉमेडीयन सुनील ग्रोवरची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर; पहा फोटो

सलमान खानचे नाव घेत राखी सावंत रोडवर ढसाढसा रडली, वाचा सविस्तर

महिमा चौधरीची मुलगी दिसते सेम तिच्यासारखी; पहा फोटो

‘द कपिल शर्मा शो’ मधील ‘हे’ दोन कलाकार लवकरचं अडकणार लग्नाच्या बेडीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.