एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक नेते आमदार, खासदार शिंदे गटात गेले. त्यानंतर शिंदे गटाने आपण खरी शिवसेना असल्याचे म्हटले होते. या प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गट हे आपआपल्या पद्धतीने युक्तिवाद करत आहे.
शिंदे गटाचे वकील हरिश साळवे आणि नीरज कौल हे शिंदे गटाकडून भक्कम बाजू मांडताना दिसत आहे. पण ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे शिंदे गटाचे सर्व दावे फेटाळून लावताना दिसत आहे. सभागृहात फुट पडली आहे पक्षात फुट पडलेली नाही, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
मी गुणदोषाच्या आधारावर युक्तिवाद करणार आहे. पक्षांतर योग्य आहे की नाही हे सभागृहात ठरवलं जाऊ शकत नाही. इथे पक्षात फुट पडलेली नाही. सभागृहात फुट पडलेली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे काही युक्तिवाद या प्रकरणात लागू पडत नाही, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
नीरज कौल यांना युक्तिवाद करण्यासाठी २० मिनिटे देण्यात आली होती. त्यावेळी कौल यांनी काही तथ्ये न्यायालयासमोर मांडली. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यांना त्याबाबत मेलही करण्यात आला होता. त्यावर ३२ आमदारांच्या सह्या होत्या. तरीही त्यांनी आमदारांना अपात्र ठरवलं, असे कौल यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही, असं आमदारांनी उद्धव ठाकरे यांना कळवलं होतं. अपात्र आमदारांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही. असं सांगतानाच बनवटी कथानकावरुन संत्तासंघर्षाचं प्रकरण लार्जर बेंचकडे देता येत नाही, असा दावा यावेळी कौल यांनी केला आहे.
राज्यपालांबरोबर बोलल्यानंतर ठाकरेंनी राजीनामा दिला का? राजकीय नैतिकता महत्वाची आहे, असे न्यायालयाने विचारलं होतं. बहुमत चाचणी होणार होती. पण त्याच्याआधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला कारण त्यांना बहुमत चाचणीला सामोरे जायचंच नव्हतं, असे कौल यांनी म्हटले आहे.
तसेच दोन वर्किंग दिवस वगळता सात दिवस बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंना दिले गेले होते.तो वेळ पुरेसा होता. तसेच या प्रकरणात नबाम रेबिया या प्रकरणाचाही विचार केला जावा. ते प्रकरण दुर्लक्ष करुन चालणार नाही, असेही कौल यांनी न्यायालयात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
लाखो रुपयांची देणगी, शेकडो विद्यार्थ्यांना जेवण, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत माणूस आहे शेतमजूर
उभ्या पिकात घुसतात बाळूमामांच्या मेंढ्या; श्रद्धेच्या नावाखाली शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार
तळपत्या उन्हात सुर्यासारखे 360 डिग्री षटकार मारतीये ही गावाकडची मुलगी, व्हिडीओजनी उडवली खळबळ