काँग्रेसमधील महत्वाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ बंडखोरीचा आवाज उठवणारे कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल(Kapil Sibbal) यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.(kapil sibbal resign from congress party)
हा अर्ज दाखल केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचा खुलासा केला आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी १६ मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पण यासंदर्भातील माहिती आज कपिल सिब्बल यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. कपिल सिब्बल यांनी राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
यावेळी कपिल सिब्बल म्हणाले की, “आम्हाला विरोधी पक्षात राहून आघाडी करायची आहे. या आघाडीमुळे आम्ही मोदी सरकारला विरोध करू. २०२४ मध्ये भारतात असे वातावरण निर्माण व्हावे की मोदी सरकारच्या उणिवा जनतेसमोर यायला हव्यात. मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करणार आहे”, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कपिल सिब्बल पुढे म्हणाले की, “मला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मी राज्यसभेचा अपक्ष उमेदवार होणार आहे याचा मला आनंद आहे. मला या देशात एक स्वतंत्र आवाज व्हायचे होते. अखिलेश यादव यांनी माझी भूमिका समजून घेतली आहे”, असे देखील कपिल सिब्बल यांनी सांगितले आहे.
यावेळी कपिल सिब्बल यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आझम खान यांचे देखील आभार मानले आहेत. आपण सपामध्ये जाणार नसून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचे कपिल सिब्बल यांनी सांगितले आहे. कपिल सिब्बल यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आज कपिल सिब्बल यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सपाच्या पाठिंब्याने ते राज्यसभेवर जात आहेत. आणखी दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. कपिल सिब्बल हे ज्येष्ठ वकील आहेत. संसदेतही ते आपले मत मांडत आले आहेत. आम्हाला आशा आहे की ते यापुढे समाजवादी पक्षाचे देखील मत संसदेत मांडतील”, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
IPL मध्ये पु्न्हा दिसणार 360 डिग्री शो, डिव्हिलिअर्स RCB मध्ये परतणार; म्हणाला, खचाखच भरलेल्या..
“अयोध्येनंतर देशात शांतता नांदेल असं वाटलं होतं, पण…”, शरद पवार पहिल्यांदाच स्पष्ट बोलले
चुकीला माफी नाही! भ्रष्टाचार करणाऱ्या आपल्याच मंत्र्यांची भगवंत मान यांनी केली हकालपट्टी, म्हणाले…