बापरे! टेलिव्हिजनवरील सर्वात महागडा कॉमेडीयन आहे कपिल शर्मा; जाणून घ्या एकूण प्रॉपर्टी

कपिल शर्मा शो गेले अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. एवढ्या वर्षांनंतरही हा कार्यक्रम नविन आणि ताजा वाटतो. या कार्यक्रमामूळे भारतातील घराघरात पोहोचलेल्या कपिल शर्माला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.

या कार्यक्रमामुळेच कपिल शर्मा टेलिव्हिजनवरील सर्वात महागडा कॉमेडीयन झाला आहे. २०१३ मध्ये कपिल शर्मा शोची सुरुवात झाली आहे. कमी वेळातच या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे.

त्यानंतर हा शो टेलिव्हिजनवरील सर्वात हिट शो झाला. या कार्यक्रमासाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. या शोच्या जोरावर कपिलने खुप प्रसिद्धि मिळवली आहे. तो छोट्या पडद्यावरील सुपरस्टार आहे.

प्रसिद्धिसोबतच त्याने खुप जास्त पैसा देखील मिळवला आहे. एका सामान्य कुटूंबातून आलेला कपिल शर्मा आज खुप मोठा स्टार आहे. कपिल आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे आज कोणत्याही गोष्टीची कमी नाही.

व्हॅनिटी वॅन –
कपिल शर्माची लाइफस्टाईल सुपरस्टारसारखी आहे. त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नाही. त्याची व्हॅनिटी देखील बॉलीवूडच्या सुपरस्टार पेक्षा कमी नाही. अनेकदा सोशल मीडियावर तो त्याच्या व्हॅनिटी वॅनचे फोटो पोस्ट करत असतो.

मुंबई करोडोंचे घर –
कपिल शर्माने पैसे मिळताच मुंबईत स्वतःचे आलिशान घर खरेदी केले आहे. त्याच्या या घराची किंमत १५ करोड आहे. तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर घराचे फोटो पोस्ट करत असतो.

पंजाबमध्ये बंगला –
मुंबईसोबतच कपिलची पंजाबमध्ये देखील प्रॉपर्टी आहे. त्याने पंजाबमध्ये सुंदर बंगला खरेदी केला आहे. सुट्ट्यांमध्ये तो आपल्या कुटुंबासोबत पंजाबला जात असतो.

महत्त्वाच्या बातम्या –

सट्टेबाजीत ३० लाखांचं नुकसान झाल्यानंतर तारक मेहतामधील ‘हा’ बडा अभिनेता बनला चोर

एकेकाळी १० रुपयात चित्रपट करणाऱ्या जयाप्रदा आज करोडोंच्या मालकीण; आहेत पाच पाच बंगले

एका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली; म्हणाल्या…

अक्षय कुमारच्या प्रेमात पडणे शिल्पा शेट्टीला चांगलेच महागात पडले; अजय देवगनने चित्रपटातून काढले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.