द कपिल शर्मा शो मधील सुगंधा ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत करणार लग्न

सध्याच्या घडीला टेलिव्हिजनवर अनेक कॉमेडी कार्यक्रम सुरु आहेत. पण सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तो म्हणजे कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये दर आठवड्याला नवनवीन कलाकार येत असतात.

कपिल शर्मा शो फक्त प्रेक्षकांनाच नाही तर कलाकारांना देखील खुप आवडतो. बॉलीवूड कलाकारांमध्ये या शोची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामूळे कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये जाणे खुप पसंत करतात. हा टेलिव्हिजनवरील सर्वात हिट शो आहे.

वेळेप्रमाणे कपिल शर्मा शोची प्रसिद्धी देखील वाढत गेली. जगभरात या शोचे फॅन्स आहेत. ह्या शोमध्ये काम करुन अनेक कलाकार प्रसिद्धझोतात आले आहेत. अशीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री सुगंधा मिश्रा.

सुगंधा मिश्रा कपिल शर्मा शो मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मराठमोळा अभिनेता संकेत भोसले याच्यासोबत सुगंधा मिश्राचे प्रेमसंबंध असल्याचं समोर येत होतं. आता या सर्वांना पुर्णविराम मिळाला आहे. सुगंधा मिश्रा आणि संकेतने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रीवेडिंग फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत.

सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे दोघे कपिल शर्मा शो मध्ये काम करतात. संकेत आणि सुगंधाच्या प्रेमाची सुरूवात इथूनचं झाली. संकेत हा प्रसिध्द कॉमेडियन असून बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मिमिक्री करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. त्यांच्या जोडीचा चाहतावर्गही मोठा आहे.

सुगंधा आणि संकेत येत्या २६ एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. कोरोनामूळे साखरपुडा आणि विवाह सोहळा एकाच दिवशी मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडणारआहे. सोशल मिडीयावर चाहत्यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबईत आलिशान घरात राहते नेहा कक्कर; पहा घराचे फोटो
किसिंग सीन दिल्यानंतर रागावलेल्या बायको मनवण्यासाठी ‘हे’ काम करायचा इम्रान हाश्मी
किसिंग सीन दिल्यानंतर रागावलेल्या बायको मनवण्यासाठी ‘हे’ काम करायचा इम्रान हाश्मी
ब्रेकिंग! राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या मराठी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे दुःखद निधन

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.