अखेर कपिलने मुकेश खन्ना यांना दिले प्रत्युत्तर; म्हणाला मी आणि माझी टीम…

महाभारत या मालिकेतील भीष्म पितामह आणि शक्तीमान मालिकेतील शक्तीमान फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शोवर जोरदार टीका केली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. कपिल शर्मा शोमध्ये दुहेरी अर्थांचे विनोद केले जातात, हा शो अश्लीलतेकडे झुकणारा असल्याची टीका मुकेश खन्ना यांनी केली होती.

महाभारत या मालिकेची पूर्ण टीम कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित होती पण फक्त मुकेश खन्नाच उपस्थित नव्हते. पण यासंदर्भात कपिल शर्माने काहीच प्रत्युत्तर दिले नव्हते पण कपिलने अखेर या विषयावर मौन सोडले आहे.

कपिलने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे की, सध्याच्या कोरोनाच्या काळात मी आणि माझी टीम लोकांनां हसवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत. संपूर्ण जग या संकटातून जात असताना लोकांच्या तोंडावर हास्य आणणे खूप महत्वाचे आहे.

आता तुम्हाला कोणत्या गोष्टीत आनंद शोधायचा आहे आणि कोणत्या गोष्टीत चुका काढायच्या आहेत हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढेही मी तेच करेन, असे कपिल म्हणाला आहे.

काय म्हणाले होते मुकेश खन्ना?
मुकेश खन्ना यांनी ट्विट केलं होतं की, जरी कपिल शर्मा शो देशातला सगळ्यात लोकप्रिय शो असला तरी मला यापेक्षा वाईट कोणताही शो वाटत नाही. यामध्ये दुहेरी अर्थाचे विनोद असतात, पुरुषांना महिलांचे कपडे घालायला देतात आणि त्याला लोक पोट धरून हसतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.