दिल्ली | केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला अनेक नेत्यांनी, कलाकारांनी, सेलिब्रिटींनी समर्थन दर्शवले आहे.
कॉमेडीयन कपिल शर्मानेदेखील ट्विटरवर आपले मत मांडले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना एकाने कपिल शर्माला ट्रोल केले होते. मात्र कपिलने त्याला असे काही झापले की त्याची बोलतीच बंद केली.
कपिल म्हणाला होता की, शेतकऱ्यांच्या मुद्दयाला राजकिय रंग न देता चर्चेने हा मुद्द्या सोडवायला हवा. असा कोणताही मुद्दा नाही जो चर्चेने सुटू शकत नाही. आम्ही सर्व देशवासी शेतकऱ्यांच्यासोबत आहोत. अशाप्रकारे ट्विट करत कपिलने शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता.
कपिलच्या याच ट्विटला घेऊन जिगर मेवात नावाच्या व्यक्तीने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याने रिप्लाय दिला की, कॉमेडियन कपिल शर्मा जरा शांत बसा. यात राजकारण करण्याचा प्रयत्न करु नका.
याशिवाय अधिक शेतकऱ्यांची काळजी किंवा मैत्री करण्याचा प्रयत्न करू नको, तुझ्याकडे जे काम दिले आहे त्यावर लक्ष केंद्रीत कर असं ट्विट त्याने केलं. हे ट्विट पाहून कपिल संतापला आणि त्याला म्हणाला, मी माझं कामच करतोय, तुम्हीही तुमचं काम करा. देशभक्त लिहिल्याने कोणी देशभक्त होत नाही.
काम करा आणि देशाच्या विकासात हातभार लावा. ५० रुपयांचे रिचार्ज मारून फालतूचे ज्ञान पाझळू नको, धन्यवाद, असा रिप्लाय कपिलने दिला. दरम्यान, पंजाब हरियाणाचे शेतकरी गेल्या ४ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून बसले आहेत आणि आक्रमक झाले आहेत.
बीएचआर घोटाळा प्रकरणाचे पुरावे आहेत; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
सार्वजनिक ठिकाणांपेक्षा घरामध्ये कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त, संशोधनातून खुलासा
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या