साऊथच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाले होते कपिल देव; केली होती लग्नाची तयारी

क्रिकेट आणि बॉलीवूडचे खुप जुने नाते आहे. आजपर्यंत अनेक कलाकारांच्या प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. अनेक क्रिकेटरचे नाव अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. काही जोडयांनी तर लग्न देखील केले आहे. जसे की, अनुष्का शर्मा – विराट कोहली, सागरिका घाडगे आणि झहीर खान.

पण काही प्रेम कहाण्या मात्र अपूर्णच राहिल्या. आज आम्ही तुम्हाला ८० आणि ९० च्या दशकातील काही प्रसिद्ध क्रिकेटर आणि अभिनेत्रींच्या जोडयांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या अफेअरचे खुप चर्चे झाले होते. पण त्यांनी लग्न केले नाही.

१)सौरव गांगुली आणि नगमा – सौरव गांगुली देखील अभिनेत्री नगमाच्या प्रेमात पडले होते. १९९९ मध्ये या दोघांची मुलाखत झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम झाले. रोज या दोघांच्या अफेअरच्या बातम्या यायच्या.

पण सौरव गांगुली अगोदरच विवाहित होते. त्यांनी आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. पण ते शक्य झाले नाही. म्हणून या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. शेवटी दोघांचे ब्रेकअप झाले.

२)सचिन तेंडुलकर आणि शिल्पा शिरोडकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील बॉलीवूडच्या जादुपासन लांब राहू शकला नाही. तो देखील एका बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. पण त्याने लग्न केले नाही.

शिल्पा शिरोडकर ९० दशकात खुप प्रसिद्ध अभिनेत्री होती. शिल्पा आणि सचिनच्या अफेअरच्या अनेक बातम्या येत होत्या. पण त्या दोघांनी कधीही या गोष्टीचा स्वीकार केला नाही. काही दिवसांनी हे दोघे वेगळे झाले. सचिनने देखील लग्न केले.

३)कपिल देव आणि सारिका – भारताला पहिले वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव सर्वात प्रसिद्ध क्रिकेटर आहेत. त्यांनी त्यांच्या खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्या काळात लाखो मुली कपिल देवच्या प्रेमात पागल झाल्या होत्या.

पण कपिल देव मात्र अभिनेत्री सारिकाच्या प्रेमात पागल झाले होते. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होत होत्या. पण काही दिवसांच्या अफेअरनंतर या दोघांचे रिलेशनशिप संपले. त्यानंतर सारिकाने कमल हसनसोबत लग्न केले.

महत्त्वाच्या बातम्या –

फक्त पाचशे रुपये घेऊन मुंबईला आली होती ‘ही’ अभिनेत्री आज कमावते करोडो रुपये

‘अजयचा मॅटर झालाय हा फोन येताच त्याचा बाप २०० फायटर पोरं घेऊन स्पाॅटवर पोहोचला’

..म्हणून आजपर्यंत महेश भट्ट आणि सलमान खानच्या कुटुंबाने एकत्र कधीही एकत्र काम केले नाही

पुजा भट्ट आणि सोहेल खानच्या अफेअरमूळे दोन्ही कुटुंबात वाद झाले

‘गरीब बॉयफ्रेंड मला नकोच’; ‘या’ अभिनेत्रीला करायचंय श्रीमंत तरुणासोबत लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.