कन्यादान का म्हणता, दान करायला मुली वस्तू आहेत का?आलिया भटचा संतापजनक सवाल

मुंबई । बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट ही नेहेमी चर्चेत असते. तीच्या आणि अभिनेता रणवीर कपूरच्या लग्नाची चर्चा सध्या चर्चेत आहे. ते दोघे कधी लग्न करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तिचे चित्रपट आणि तिचे अफेअर याबाबत सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सूकता असते.

असे असताना आता आलिया एका जाहिरातीवरून चर्चेत आली आहे. तिने एक प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक तरुणींसाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अशा विषयावर आलियाने आवाज उठवला आहे. सध्या तिने एक जाहिरातीचे शुट केले आहे.

यामध्ये नवरी असलेली आलिया लग्न मंडपात येते, पती देखील जवळ असतो. नंतर लग्नाचे विधी होतात. आलियाला लग्न या विषयावर एक मुलगी म्हणून आतापर्यंत कोण काय- काय बोलले आहे, ते सगळे आठवत जाते. तिला आठवते तिने ऐकलेले असते की, मुलगी हे परक्याचे धन आहे. पण मुलींना असे का म्हणतात, याबाबत ती दु:खी होते.

माझ्या आई- वडिलांचे घर हे माझे घर नाही का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत असतात. कन्यादान होत असताना वधुपिता आपल्या लेकीचा हात नवरदेवाच्या हातात देत असतो. हा विधी सुरू होताना अचानक नवरदेवाची आई थांबते आणि मुलाला एकट्याला हात पुढे करू देण्याऐवजी ते सगळे कुटूंबच हातात हात घेतात.

यामुळे मात्र हा नवा विचार आलियाला सुखावून टाकतो आणि ती मोठ्या आनंदाने आणि तेवढ्याच अभिमानाने म्हणते की, कन्यादान का म्हणता?, कन्यामान म्हणा. आमचे दान करायला किंवा आम्हाला असे कुणाला तरी देऊन टाकायला आम्ही काही एखादी वस्तू आहोत का? यामुळे ही जाहिरात मनाला भावते.

कन्यादान हा शब्द ऐकताच प्रत्येक मुलीला एकदा तरी मनातून नक्कीच वाटून जाते की आपले दान का करायचे? ती एखादी निर्जिव वस्तू आहोत का? माझ्या लग्नात मी अशा गोष्टी अजिबात होऊ देणार नाही, असे अनेक मुली ठरवतात. मात्र वास्तवात वेगळेच होते. नव्या विचारांच्या मुलींना आलियाचा हा विचार निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.