Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. अशातच महाराष्ट्रात 18 जिल्ह्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाकडून काल जाहीर करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थामधील सर्वात खालची संस्था होय. त्यामुळे या निवडणुकांना एरवी एवढे महत्व दिले जात नाही. या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जातात. यात कोणत्याच राजकीय पक्षाला प्रत्यक्षरित्या भाग घेण्याची परवानगी नसते.
त्यामुळे या निवडणुकांची फारशी चर्चा राज्याच्या राजकारणात होत नसते. पण सध्या महाराष्ट्रातील राजकारण इतकं तापलेले आहे की, साध्या साध्या गोष्टीवरून राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी शोधत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीने ही संधी राजकीय पक्षांना आयतीच मिळाली.
या निवडणुकीत जरी राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी नेते मंडळी आपआपल्या प्रभाव क्षेत्रात स्थानिक पातळीवर निवडणूक लढवतात. यावरूनच त्या नेत्याचा त्या-त्या भागातील प्रभाव दिसून येतो. प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मोठ्या प्रस्थापितांना धक्का बसत असतो.
या 18 जिल्ह्यातील सर्वात जास्त लक्ष वेधले ते म्हणजे ठाणे जिल्ह्याने. ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेंचा गड मानला जातो. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना आपली राजकीय ताकत दाखवण्याची चांगली संधी होती. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये 31 ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने तर 29 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवला.
दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात 35 ग्रामपंचायतमधील 15 वर शिंदे गटाने विजय मिळवला. तर 12 ग्रामपंचायतीवर भाजपाचा विजय झाला. तर 5 ठिकाणी ठाकरे गटाला यश मिळाले. ठाणे जिल्ह्यात एकूण 158 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या. परंतु काही ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या. त्यामुळे 134 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. यात दोन्ही गटांना जवळपास सारखाच कौल मिळाला.
महत्वाच्या बातम्या
Vasant more : ‘घाबरू नका, मी अजून जागा आहे’! तुफान पावसात नागरीकांच्या मदतीसाठी वसंत मोरे रस्त्यावर, लोकं म्हणाली..
Rajasthan: ‘या’ जत्रेत मुली लिव्ह-इनसाठी शोधतात मुलं, नंतर मुल झाल्यानंतर करतात लग्न, वाचून अवाक व्हाल
Kolhapur : ‘…तेव्हा का संस्कृती जपली नाही?’; काँग्रेसची रणरागिणी भाजपविरोधात कडाडली