कन्नड सिनेसृष्टीतील छोट्या बजेटचा चित्रपट ‘कांतारा’ रिलीज होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता ऋषभ शेट्टी दिसला होता, ज्याच्या कामाला चांगलीच पसंती मिळत आहे. ऋषभला बॉलिवूडमधूनही ऑफर येऊ लागल्या आहेत.
आता अभिनेत्याने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, आजच्या काळात बॉलीवूड कुठे चुकत आहे? ऋषभ शेट्टीने बॉलिवूडमधील निर्मात्यांना काही सल्ला दिला आहे. जर त्यांना सिनेमा चांगला बनवायचा असेल तर घमंडी बनू नका आणि पाश्चात्य संस्कृतीचा फारसा प्रभाव पडू देऊ नका, असे अभिनेत्याने सांगितले आहे.
प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन चित्रपट तयार केले पाहिजेत, असे अभिनेत्याने म्हटले आहे. ऋषभ शेट्टीने अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांना सांगितले की, आम्ही प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो, स्वतःसाठी नाही. आपण त्यांना आणि त्यांच्या भावना लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यांची मुल्ये आणि जीवनपद्धती काय आहेत हे बघायला हवे. आम्ही चित्रपट निर्माते होण्यापूर्वी त्यांच्या ठिकाणी होतो.
ऋषभ शेट्टी पुढे म्हणाला की, आजच्या काळात निर्मात्यांवर खूप पाश्चात्य प्रभाव आहे, जो त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येतो. पण आता ते भारतीय चित्रपटांमध्येही पाश्चिमात्य प्रभाव, हॉलिवूड आणि इतर गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण हे का करत आहोत? लोक आधीच हॉलीवूडशी संलग्न आहेत, त्यामुळे अशा गोष्टी करण्याचा कोणताही फायदा होत नाही.
ऋषभ शेट्टीला बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या पण त्याने या ऑफर्स नाकारल्या आहेत. ‘कंतारा’ बद्दल बोलायचे तर हा चित्रपट कन्नड भाषेत 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सुरुवातीच्या दिवसांत कन्नड भाषेत चांगला प्रतिसादही मिळाला होता.
त्यानंतर हा चित्रपट हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आणि ‘कंतारा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने जगभरात 300 कोटींचा आकडा पार केला असून ‘कंतारा’ हा असा दुसरा कन्नड चित्रपट ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर ‘KGF Chapter 2’ आहे.
महत्वाच्या बातम्या
Virat Kohli : थेट सुपरमॅनसारखा उडत विराटने घेतला जबरदस्त कॅच, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल
Sania Mirza : सानिया मिर्झा-शोएब मलिकच्या नात्यात आलाय दुरावा? सानिया म्हणाली, मी सर्वात वाईट…
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने विराट-रोहितला टाकलं मागे, टी २० वर्ल्डकपमध्ये शतक ठोकत केला ‘हा’ मोठा विक्रम