‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्री झाली होती घरेलू हिंसाचाराची शिकार; स्वत: केला होता ‘हा’ मोठा खुलासा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता. ज्यावेळी सगळीकडे जुने गाण्यांचे रिमिक्स ऐकले जात होते. त्यामूळे अनेक कलाकारांना खुप जास्त प्रसिद्ध मिळाली होती. अशीच एक कलाकार म्हणजे शेफाली झरीवाला. कांटा लगा गर्ल म्हणून शेफाली खुप प्रसिद्ध आहे.

१९७२ मध्ये रिलीज झालेल्या ‘समाधी’ चित्रपटातील हे गाणं होत. २००२ मध्ये कांटा लगा गाण्याचा रिमेक बनवण्यात आला होता. या रिमेकमध्ये शेफाली झरीवालाने काम केले होते. या गाण्यामूळे शेफाली रातोरात सुपरस्टार झाली होती. या गाण्यामूळे ती घराघरात पोहोचली होती.

कांटा लगा गाणे खुपच हिट झाले होते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि लग्नात हे गाण वाजवल जात होते. या गाण्यातील शेफाली प्रसिद्धझोतात आली होती. त्यामूळे तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. तिने ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

बॉलीवूडमध्ये काही दिवस काम केल्यानंतर शेफालीने साऊथ चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिने कन्नड, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काही दिवस काम केले. त्यानंतर शेफालीच्या आयूष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. शेफालीने प्यार हमे किस मोड पे ले आया अल्बमध्ये हरमीत गुलजारसोबत काम केले होते.

या गाण्याची शुटींग वेळी दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये शेफाली आणि हरमीतने लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही शेफालीने हरमीतवर घरेलू हिंसाचाराचा अरोप केला होता.  तिने हा खुलासा केला होता. २००९ मध्ये हे दोघे वेगळे झाले.

घटस्फोटानंतर शेफाली अनेक दिवस लाइमलाईटपासून लांब होती. त्यावेळी शेफालीच्या मृत्यूच्या बातम्या देखील आल्या होत्या. शेफालीने आत्महत्या केली असे बोलले जात होते. म्हणून शेवटी शेफाली मिडीयासमोर आली आणि तिने या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले.

लाइमलाईटमध्ये परत आल्यानंतर शेफालीच्या आयूष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. पराग त्यागी आणि शेफालीच्या अफेअरच्या बातम्या येत होत्या. २०१४ मध्ये शेफाली आणि परागने लग्न केले. नच बलिये या कार्यक्रमाच्या सेटवर परागने शेफालीला लग्नासाठी प्रपोज केले होते आणि तिने होकार दिला.

शेफालीने बिग बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता. आज ती तिच्या नवऱ्यासोबत मुंबईत राहत आहे. शेफाली करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे. तिच्या अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. त्यासोबतच तिने अनेक ठिकाणी घर आहेत. शेफाली सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

महत्वाच्या बातम्या –

अमृता सिंग गेल्या पंधरा वर्षांपासून आहे सिंगल; जाणून घ्या कारण

पहा मराठमोळ्या अलका कुबलच्या नवऱ्याचे फोटो; आहे प्रसिद्ध फोटोग्राफर

‘या’ अभिनेत्रीने पार केल्या बोल्डनेसच्या सगळ्या सीमा; शेअर केले बाथरुममधले फोटो

नवाब सैफ अली खानच्या बायकोचे होते ‘एवढ्या’ लोकांसोबत अफेअर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.