“अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का?”; कंगणा रणौत

‘अमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ‘ओटीटी’वर प्रदर्शित झालेली पॉलिटिकल ड्रामा वेब सिरीज ‘तांडव’ प्रदर्शनानंतर वादात सापडली आहे. या घटनेवरुन बरंच राजकारणही सुरु आहे. या वादात आता अभिनेत्री कंगणा रणौतने उडी घेतली आहे.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. कपिल मिश्रा यांनी अली अब्बास जफर यांच्या माफीनाम्याचं एक ट्विट केले होते. यात कपिल मिश्रा यांनी जफर यांना असा सवाल केला होता की, ते असे त्यांच्या धर्मासोबत करू शकतात का. हाच व्हिडीओ कंगनानं रिट्विट केला आहे.

कंगनाने लिहिले की, “तुमच्यामध्ये अल्लाची टिंगल करण्याची हिंमत नाही का, दरवेळी हिंदू धर्माला धारेवर धरुन त्याची थट्टा केली जाते. हे बरोबर नाही. पुढे ती म्हणाली, आता कळते आहे की, निर्मात्यांनी माफी मागितली आहे मात्र ती मागण्यासाठी कुठे वाचणार ?” असा सवाल तिने केला आहे.

“हे तर थेट गळाच चिरतात, जिहादी देश फतवाच काढता, लिब्ररल मीडिया वर्च्युअल लॉन्चिंग करते, तुम्हाला केवळ मारलंच जात नाही, तर तुमच्या मृत्यूला जस्टिफायही करण्यात येते. अशावेळी अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का?” असे कंगणानं म्हटले आहे.

वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यात मोहम्मद झीशान अयूब नाटकात काम करताना दाखवले आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. यावेळी तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. तांडव या सिरीजमध्ये भगवान राम, नारद आणि शंकर या हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचा आरोप करून सिरीजवर बंदीची मागणी करण्यात आली आहे.

हसावं की रडावं! सुनेनी केलं भांडण मग सासरा चढला झाडावर; खाली उतरण्यास सांगुनही ऐकेना

दोस्तीत कुस्ती? पूनावालांनी सांगूनही शरद पवारांनी सीरमची लस घेणे टाळले कारण…

महाराष्ट्रातील या गावाबद्द्ल तुम्हाला माहिती आहे का; जिथे बेरोजगार शोधुन सापडणार नाय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.