‘मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झाले तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही’

मुंबई : सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणावत प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि जया बच्चन यांच्यासोबत कंगनाचे शाब्दिक युद्ध सुरु आहे.

तसेच कंगनाने ऊर्मिला मातोंडकर हिचा उल्लेख ‘सॉफ्ट पोर्न स्टार’ असा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्याला ऊर्मिलाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून जोरदार आक्षेप घेतला आहे.

आता पुन्हा एकदा कंगनाने ट्विट केले आहे. ‘मी क्षत्रीय आहे, शीर धडावेगळं करु शकते, पण ते कोणासमोर झुकवू शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवत राहीन,’ असे कंगनाने म्हंटले आहे.

याचबरोबर पुढे ‘मान, सन्मान आणि स्वाभिमानाने जगते. राष्ट्रवादी बनून अभिमानाने जगते. तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही, ना ही करेन, जय हिंद!” असे ट्वीट तिने केले आहे.

दरम्यान, ‘माझ्या कार्यालयात बेकायदा बांधकाम झाले आहे, असे कारण देत मुंबई महापालिकेने ते बांधकाम पाडण्याची केलेली कारवाई म्हणजे माझी स्वप्ने, आत्मसन्मान व भविष्यावर केलेला बलात्कारच आहे,’ असेही कंगनाने ट्वीट करत म्हंटले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

‘घरगुती गॅसबाबत सरकारचा नवा नियम; जर तुमच्याकडे ‘हे’ नसेल तर तुम्हाला गॅस मिळणार नाही’

“हिरोसोबत झोपल्यानंतरच दोन मिनिटांचे आयटम सॉंग किंवा एक रोमँटिक सीन मिळत होता”

मोदींविरोधात राष्ट्रीय बेरोजगार मोहीम सुरू असतानाच राज्य सरकारकडून सर्वांत मोठी भरती जाहीर  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.