पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करताच कंगना कडाडली; म्हणाली…

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. २०१४-१५ साली अनुराग कश्यपला आपण भेटलो त्यावेळी दारूच्या नशेत त्याने आपल्यासह जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे पायलने सांगितले आहे.

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचे खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा,’ असे ट्विट पायलने केले होते.

याचाच धागा पकडत अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा भाष्य केले आहे. अनुरागला अटक करा, अशी मागणी करत कंगनाने केली आहे. तसेच पुढे बोलताना कंगनाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा कंगना चांगलीच चर्चेत आली आहे.

याबाबत बोलताना कंगना म्हणतीये, अभिनेत्री पायल घोषने जे काही सांगितले, ते माझ्यासोबतही घडले आहे. असे अनेक बडे हिरो आहेत, ज्यांनी माझ्यासोबतही असला प्रकार केला असल्याचा खळबळजनक आरोप कंगनाने केला आहे. ‘माझ्यासोबत जे काही झाले, त्याचा मी माझ्यापरीने निकाल लावला. मला मीटूची गरज नाही. पण मुलींनी याबद्दल अवश्य विचार करावा, असे कंगनाने म्हंटले आहे.

दरम्यान, ‘बॉलिवूड पूर्णपणे लैंगिक भक्षकांनी भरलेले आहे. हे लोक केवळ लोकांना दाखवण्यासाठी लग्न करतात. प्रत्यक्षात दरदिवशी स्वत:ला खूश करण्यासाठी त्यांना सुंदर मुलगी हवी असते,’ असे ट्विट कंगनाने केले आहे. कंगनाने केलेल्या या धक्कादायक खुलास्यामुळे पुन्हा एका सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.