बाॅलीवूडचे सर्व लांडगे आता एकत्र आलेत; महीलांवर, शेतकऱ्यांवर अन्याय होतो तेव्हा हे कुठे जातात

बॉलीवूडच्या सर्वात जास्त चर्चेत राहणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री कंगना राणावतचे पहीले येते. कारण कंगना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमूळे चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या ट्विटमुळे खुप जास्त चर्चेत आली आहे.

कंगना नेहमीच प्रत्येक गोष्टीवर बिनधास्तपणे तिचे मत मांडत असते. या वेळेसही कंगनाने तेच केले आहे. बॉलीवूडबद्दल खोट्या अफवा पसरवल्याबद्दल बॉलीवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी टिव्ही चॅनेल्स विरोधात तक्रार दाखल केला आहे.

याच गोष्टीबद्दल कंगनाने मत व्यक्त केले आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बॉलीवूड चित्रपटांच्या सेटवर काम करणाऱ्या वर्कर्सचा आहे. हा व्हिडिओ कामगारांना देण्या जाणाऱ्या वागणूकीचा खुलासा करत आहे.

कंगना म्हणाली की, ‘बॉलिवूडमधील सर्वजण सध्या मीडियाविरुद्ध एकत्र आलेत आहेत. मीडियावर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. मजुरांवर, शेतक-यांवर, महिलांवर, देशातील गरिबांवर अन्याय होतो, त्यावेळी हे लोक कुठे जातात? आज ही मंडळी मानवाधिकाराच्या बाता मारताहेत, पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा हे मूग गिळून गप्प बसतात,’

या व्हिडिओच्या माध्यमातून तिने माध्यमांविरूद्ध खटले दाखल केलेल्या सर्व बॉलिवूड निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यासोबतच कंगनाचे ट्विट देखील लोकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

महत्वाच्या बातम्या
कंगणाने आता घेतला थेट टाटांशी पंगा; लव्ह जिहादच्या मुद्यावर भिडली
रवी किशनच्या मुलीसमोर ऐश्वर्या, दिपीका पडतील फिक्या, दिसायला आहे खुपच हॉट; पहा फोटो
सैराटने अख्ख्या महाराष्ट्रात फेमस केलेला परश्या सद्या काय करतोय? पहा..
बापाने आश्रमात जायचा निर्णय घेतल्यावर पाच वर्षाच्या साध्याभोळ्या अक्षय खन्नाने काय केलते पहा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.